NCHM JEE 2021: हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेचा अर्ज करण्याची तारीख वाढली, जाणून घ्या

2021: राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने प्रवेश परीक्षा एनसीएचएम जेईई २०२१ साठी अर्ज करण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. जाहीर केलेल्या नोटीसनुसार आता ५ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतात. तसेच ५ जुलै २०२१ च्या रात्री ११.५० पर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईन माध्यमातून भरता येणार आहे. दिलेल्या नव्या तारखेपर्यंत आलेल्या अर्जात बदल करण्यासाठी ७ जुलै ते ११ जुलै २०२१ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. एनटीए देशातील सर्व सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये हॉटेल मॅनेजमेंटच्या अंडरग्रॅज्यूएट कोर्स - बीएससी (हॉस्पिटॅलिटी अॅण्ड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) मधील प्रवेशासाठी होणाऱ्या नॅशनल काउंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट जॉइंट एन्ट्रंस एग्झामिनेशनसाठी (एनसीपी) शेवटची तारीख १२ मे वाढवून १२ जूनपर्यंत आणि त्यानंतर २७ जून करण्यात आली. एनसीएचएम जेईई २०२१ साठी अर्ज प्रक्रिया ३ फेब्रुवारी २०२१ ला सुरु केली होती. एनसीएचएम जेईई २०२१: अर्ज प्रक्रिया जे उमेदवार एनसीएचएम जेईई २०२१ परीक्षेत सहभागी होऊ इच्छित आहेत त्यांना ऑनलाईन अर्ज nchmjee.nta.nic.in वर जाऊन करावा लागेल. अर्ज प्रक्रियेनंतर अंतर्गत उमेदवारांना आधी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर दिलेल्या अर्ज नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉगइन करुन आणि दिलेल्या स्टेप्स पूर्ण करुन उमेदवार आपली नोंदणी पूर्ण करु शकतात. एनटीएने जाहीर केलेल्या एनसीएचएम जेई २०२१ इंफॉर्मेशन बुलेटिननुसार, इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्डातून सिनियर सेकेंडरी (१०+२) परीक्षा इंग्रजी विषयासहित उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. तसेच बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची वाट पाहणारे उमेदवार देखील अर्ज करु शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3drDaht
via IFTTT

Post a Comment

0 Comments