NEET UG 2021:नीट यूजी परीक्षा स्थगित होण्याची शक्यता,जाणून घ्या अपडेट्स

NEET UG 2021:नॅशनल टेस्टिंग एजन्सी(NTA)द्वारे घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा()१ ऑगस्ट २०२१ रोजी होणार होती. पण अधिकृत वेबसाइटवर नीट परीक्षांचे अर्ज फॉर्म अद्यापही आले नाहीत. तसेच यासंदर्भात कोणती अपडेट देखील आली नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात एनटीए ची अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in लॉन्च केली होती. या नवीन वेबसाइटवर नीट परीक्षेसाठी एप्लीकेशन फॉर्म उपलब्ध केला जाईल अशी माहिती दिली होती. दुसरीकडे, मिडिया रिपोर्ट्सनुसार, स्थगित होण्याची शक्यता आहे. एनटीएद्वारे निर्धारित केलेल्या १ ऑगस्टला परीक्षा होणं शक्य नाही. नोंदणी प्रक्रिया आणि परीक्षा केंद्र निवडण्यात साधारण ४५ दिवसांचा कालावधी लागतो. पण नोंदणी प्रक्रियाच अजून सुरु झाली नाही. एनटीएने वेळेवर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु केली तर २५ दिवसांचा वेळ देण्यावर विचार केला जाऊ शकतो. १ ऑगस्टला परीक्षा घ्यायची असेल तरी जुलै शेवटापर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे. १ ऑगस्टला परीक्षा आयोजित करण्याइतका वेळ नाहीय. कदाचित १ जुलैपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु होऊ शकते आणि ऑगस्ट शेवटापर्यंत परीक्षा स्थगित केली जाऊ शकते असे देखील मत तज्ञ व्यक्त करतात. नीट यूजी परीक्षेचे आयोजन एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसोबत बीएएणएमस, बीएमएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केले जाते. परीक्षा ही ऑफलाइन म्हणजे पेन आणि पेपरवर होईल हे एनटीएने स्पष्ट केले आहे. परीक्षेचे आयोजन हिंदी आणि इंग्रजीसहित एकूण ११ भाषांमध्ये केले जाणार आहे. NTA ने २०२१ सत्रासाठी नवी NEET वेबसाइट जाहीर केली आहे. आता NEET २०२१ चे रजिस्ट्रेशन nta.neet.nic.in वर होईल. सुमारे १६ लाख उमेदवारांसाठी NEET Application 2021 भरले जाऊ शकतात. जे उमेदवार NTA NEET वेबसाइट वर रजिस्ट्रेशन करतील त्यांना लॉगिन डिटेल्स दिले जातील. हे लॉगिन वापरून nta.neet.nic.in वर जाऊन आपल्या अर्जाची स्थिती किंवा अन्य कुठलेही अपडेट जाणून घेऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vN0pZJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments