Indian Navy Jobs: भारतीय नौदलात २५०० पदांच्या भरती परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी

Indian Navy SSR AA Recruitment 2021 Admit Card: भारतीय नौदलाने (Indian Navy) ने आर्टिफिसर अप्रेंटिस (AA) आणि सिनियर सेकेंडरी रिक्रूट (SSR) अंतर्गत नाविक पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा आणि पीईटी (PET) चे अॅडमिट कार्ड जारी केले आहे. जे उमेदवार ही भरती परीक्षा देणार आहेत, त्यांनी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वरून आपले कॉल लेटर डाऊनलोड करावे. बॅचचे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. तेथे अॅप्लिकेशन डॅशबोर्ड मध्ये लॉग इन करावे लागेल. भारतीय नौसेना प्रवेश पत्र लिंक पुढे देण्यात आली आहे. उमेदवार पुढे दिलेल्या थेट लिंकच्या माध्यमातूनही आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. Indian Navy Admit Card 2021 कसे कराल डाऊनलोड? १: भारतीय नौदलाची अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जा. २: होम पेज वर, 'Candidate Login' टॅब वर क्लिक करा. ३: येथे Correspondence State आणि कॅप्चा कोड भरा. ४: आता विचारलेली माहिती भरा. ५: भारतीय नौदल एए एसएसआर अॅडमिट कार्ड 2021 आता स्क्रीनवर उघडेल ६: ते डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट काढून ठेवा. भरतीचा तपशील (Indian Navy Vacancy 2021 Details) ऑगस्ट २०२१ बॅच मध्ये एकूण २५०० रिक्त जागा उपलब्ध आहेत. यापैकी दोन हजार एसएसआरसाठी आणि ५०० एए साठी आहेत. नाविक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज एए-१५० आणि एसएसआर-०२/२०२१ बॅच २६ एप्रिल २०२१ से ५ मे २०२१ पर्यंत मागवण्यात आले होते. परीक्षेची तारीख आणि मेरिट लिस्ट भारतीय नौदल एसएसआर एए भरतीसाठी लेखी परीक्षा आणि फिजिटल फिटनेस टेस्ट जून किंवा जुलै २०२१ जुलाई 2021 मध्ये आयोजित केली जाणार आहे. मेरिट लिस्ट २३ जुलै २०२१ रोजी वेबसाइटवर अपलोड करण्यात येईल. एए- अखिल भारतीय योग्यता क्रमवारीत टॉप ६०० (सुमारे) आणि एसएसआर- सुमारे २५०० उमेदवारांना राज्यनिहाय पात्रतेच्या आधारे आयएनएस चिल्का मध्ये अंतिम यादी चाचणीसीठी कॉल लेटर जातील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j1mLDO
via IFTTT

Post a Comment

0 Comments