NFL Recruitment 2021:विवध पदांची भरती, १ लाख ४० हजार पगार

NFL Recruitment 2021:नॅशनल फर्टिलाइजर्स लिमिटेड ()मध्ये विविध पदांवर भरती सुरु आहे. त्याअंतर्गत सिनियर मॅनेजर, अकाउंट्स ऑफिसर आणि असिस्टंट मॅनेजर, मॅटेरियल्स ऑफिसरच्या पदांवर भरती केली जाणार आहे. NFLमध्ये एकूण २३ पदांवर भरती केली जात आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळ https://ift.tt/1cXifgC वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २५ जून ही शेवटची तारीख आहे. यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. नॅशनल फर्टिलाइजर्स लिमिटेडच्या वतीने जाहीर केलेले नोटिफिकेशननुसार उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायला हवे. त्यानंतरच अर्ज करायला हवा. अर्जामध्ये कोणतीही गडबड वाटल्यास रिजेक्ट केला जाणार आहे. रिक्त जागा सिनियर मॅनेजर- २ पोस्ट अकाउंट्स ऑफिस- ७ पोस्ट असिस्टेंट मॅनेजर- ४ पोस्ट मॅटेरियल्स ऑफिस- १० पोस्ट महत्वाच्या तारखा नोटिफिकेशन जाहीर होण्याची तारीख- २६ मे २०२१ ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख- २५ जून २०२१ एनएफएल भरती २०२१: असे मिळेल वेतन सिनियर मॅनेजर- ८० हजार ते २ लाख २० हजार अकाउंट्स ऑफिस- ४० हजार ते १ लाख ४० हजार असिस्टंट मॅनेजर -५० हजार ते १ लाख ६० हजार मॅटेरियल्स ऑफिस -४० हजार ते १ लाख ४० हजार याव्यतिरिक्त अलीकडेच नॅशनल फर्टिलाइजर्स लिमिटेड ( National Fertilizers Limited, NFL) ने मॅनेजमेंट ट्रेनी(Management Trainee) पदाची परीक्षा घेतली होती. ही परीक्षा १८ फेब्रुवारी २०२१ रोजी झाली होती. याचा निकाल https://ift.tt/3cqLgpS अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आला होता. परीक्षा आणि भरतीसंदर्भातील माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Td509C
via IFTTT

Post a Comment

0 Comments