NIOS On-Demand Exams 2021 परीक्षा रद्द, 'या' मूल्यांकन पद्धतीने जाहीर होणार निकाल

On-Demand Exams 2021: संस्थेने जाहीर केलेल्या अधिकृत नोटीसनुसार थेअरी आणि प्रॅक्टीकल दोन्ही रद्द करण्यात आल्या आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षा १९ एप्रिल ते ३१ मे २०२१ दरम्यान होणार होत्या. पण देशभरात पसरलेल्या करोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय मुक्त शिक्षा संस्थेने (National Institute of Open Schooling) एनआयओएस ऑन-डिमांड परीक्षेच्या २०२१ तारखा रद्द केल्याची घोषणा केली. यासोबतच रद्द केलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यासाठी मूल्यांकन पद्धतीची माहिती देण्यात आली. संस्थेने जाहीर केलेल्या नोटिसनुसार एनआयओएस ओडीई रिझल्ट २०२१ ची घोषणा ही रद्द केल्या गेलेल्या पब्लिक एग्झामच्या मूल्यांकन पद्धतीनुसार होणार आहे. याप्रकारे एनआयओस ओडीई सेकेंडरी रिझल्ट २०२१ साठी सेकेंडरी पब्लिक एग्झामच्या मूल्यांकन पद्धतीनुसार आणि एनआयओएस ओडीई सिनिअर सेकेंडरी रिझल्ट २०२१ हा सिनियर सेकेंडरी पब्लिक एग्झामसाठी निर्धारित केलेल्या मूल्यांकन पद्धतीनुसार तयार केला जाणार आहे. एनआयओएस ओडीई रिझल्ट तारीख दुसरीकडे, केंद्रीय बोर्ड - सीबीएसई, आयएससी आणि वेगवेगळ्या राज्यांतील बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एनआयओएसला आदेश दिले होते. यानुसार बारावीच्या रद्द केलेल्या पब्लिक परीक्षेसाठी १० दिवसात आणि रिझल्टची घोषणा ३१ जुलैपर्यंत करावी असे म्हटले होते. या आदेशानुसार एनआयओएसद्वारे मूल्यांकन पद्धतीची घोषणा लवकरच होणार आहे. तसेच ओडीई रिझल्टची घोषणा ३१ जुलैपर्यत केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SHmag0
via IFTTT

Post a Comment

0 Comments