Also visit www.atgnews.com
oxypark: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सावित्रीबाई फुले विद्यापीठाला 'हा' इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाने स्वतः झाडे लावून, पैसे खर्च करून उभारून त्यासाठी नागरिकांकडून शुल्क घ्यावे. मात्र, विद्यापीठात वर्षानुवर्षे असलेली झाडे आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी ऑक्सीपार्कच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे घेणे चुकीचे आहे. मी नागरिकांच्या बाजूने असून विद्यापीठाने पैसे आकारू नयेत, यासाठी कोणत्याही प्रकारचा रोष पत्करायला तयार आहे , असे सांगत यांनी ऑक्सीपार्कच्या मुद्द्यावरून सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाला इशारा दिला आहे. (higher and technical education minister warns savitribai phule university) क्लिक करा आणि वाचा- ऑक्सीपार्कसाठी विद्यापीठाने पैसे आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक नागरिकांनी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी माझ्याशी संवाद साधला. त्यावर तातडीने कार्यवाही करत ऑक्सीपार्कच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. विद्यापीठाने स्वतःचे पैसे खर्च करून उत्तम ऑक्सीपार्कची निर्मिती करावी आणि मग नागरिकांकडून खुशाल शुल्क वसूल करावे, असेही सामंत यांनी सांगितले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jeFeNr
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments