Also visit www.atgnews.com
QS World University Rankings: ३ भारतीय विद्यापीठांचे स्थान कायम, JNU ची मोठी कामगिरी
Quacquarelli Symonds (QS)या विद्यापीठांची रॅंकिंग जाहीर करणाऱ्या संस्थेने मंगळवारी ८ जूनला Rankings 2022 जाहीर केली. या रॅंकिंगच्या टॉप २०० संस्थामध्ये ३ भारतीय उच्च शिक्षण संस्था आहेत. आयआयटी मुंबई (१७७ वे स्थान), आयआटी दिल्ली (१८५ वे स्थान) आणि आयआयएससीं बंगळुरु (१८६ वे स्थान आणि जगातील टॉपची रिसर्च युनिव्हर्सिटी) यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. जगातील २०० शीर्ष संस्थांमध्ये इतर कोणत्याही भारतीय संस्थानी २०१७ पासून जागा बनवली नव्हती. जागतिक रँकिंगच्या टॉप १००० मध्ये भारतीय उच्च शिक्षण संस्थांच्या एकूण संख्येत यावर्षी देखील कोणता बदल झाला नाही. २०१८ च्या रॅंकिंगमध्ये एकूण २० भारतीय संस्था होत्या. २०१९ मध्ये २४, वर्ष २०२० मध्ये २३ आणि २०२१ या वर्षात २१ भारतीय संस्थांनी जागा बनवली. २०२२ साठी २२ भारतीय संस्थाना स्थान मिळाले आहे. टॉप १००० विद्यापीठांच्या यादीत जवाहरलाल नेहरु विद्यापीठासारख्या भारतीय संस्थांचा नव्याने प्रवेश झाला आहे. जागतिक रॅंकिंग २०२२ मध्ये इंजिनिअरिंग कोर्स असलेले जेएनयू रेटिंगसाठी पात्र ठरले. यूजी आणि पीजी दोन्ही कोर्स घेणाऱ्या संस्थांमध्ये जेएनयूला स्थान मिळाले आहे.या विद्यापीठाने ५६१-५७० रॅंकिंग बॅंडमध्ये स्थान मिळवले आहे. वर्ल्ड यूनिवर्सिटी रॅंकिंग २०२२ मध्ये दिल्ली विद्यापीठ (डीयू) ने ५०१-५१० रॅंकिंग बॅंडमध्ये स्थान मिळाले. तर दुसरीकडे बनारस विद्यापीठ (बीएचयू), जिल्हा ग्रामीण विद्यापीठ (एएमयूयू) आणि अमृता विश्वविद्यालय विद्यापीठांना यावर्षीच्या टॉप १००० मध्ये स्थान मिळाले नाही. या तिन्ही संस्थांचे रॅंकिंग ८०१-१००० बॅंडहून खाली येऊन १००१-१२०० बॅंडमध्ये पोहोचले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3x8sCLr
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments