RIMC Admission 2021: राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेश पात्रता परीक्षा अर्जांना मुदतवाढ

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून ( Admission)प्रवेशपात्रता परीक्षा जून २०२१ साठी अर्ज करण्याच्या मुदतीत पुन्हा वाढ केली आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सद्यस्थितीत लॉकडाऊनच्या परिस्थितीचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सांगितले. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडूनची प्रवेश पात्रता परीक्षा ५ जून २०२१ रोजी होणार होती. पण कोविड-१९ परिस्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येते. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत १० जून २०२१ रोजी संपणार होती. ही मुदत आता २१ जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. डेहराडून येथील लष्करी महाविद्यालयासाठी प्रवेशासाठीची प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू आहे. सध्या देशात व राज्यात करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाउनची परिस्थितीचा विचार करून परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xfZYIr
via IFTTT

Post a Comment

0 Comments