Also visit www.atgnews.com
SSC CHSL:कर्मचारी निवड आयोगाकडून CHSL निकाल जाहीर, थेट लिंक इथे पाहा
Result announced:कर्मचारी निवड आयोगाने () कम्बाइंड हायर सेकंडरी लेवल परीक्षेच्या(CHSL Exam) निकालाची घोषणा केली. स्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC)ची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर निकाल जाहीर करण्यात आला आहे. डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनसाठी शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची यादी एसएससीने जाहीर केली आहे. एसएससी सीएचएसएल २०१८ भरतीसाठी झालेल्या परीक्षेचा हा निकाल आहे. वेगवेगळ्या पदांसाठी झालेल्या टायपिंग टेस्टमध्ये सहभागी झालेले उमेदवार आपला निकाल तपासू शकतात. वेगवेगळ्या पदांचे रिझल्ट पाहण्यासाठी या बातमीखाली थेट लिंक देण्यात आली आहे. त्यावर क्लिक करुन संपूर्ण निकाल पाहा. एसएससी ने सीएचएसएल २०१८ एग्झाम टियर -२ चा रिझल्ट २५ फेब्रुवारी २०२० रोजी जाहीर केला. त्यानंतर २७ ऑगस्ट २०२० रोजी एडिशनल रिझल्ट देखील प्रकाशित झाला. त्यापूर्वी टाइपिंग टेस्ट किंवा डेटा एंट्री स्पीड टेस्ट (SSC CHSL DEST) साठी उमेदवार शॉर्टलिस्ट केले होते. डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन (SSC CHSL Document Verification)चे वेळापत्रक एसएससीच्या रिजनल वेबसाइट्सवर लवकरच जाहीर करण्यात येईल. उमेदवारांनी संबंधित वेबसाईट पाहत राहणे गरजेचे आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35azJY0
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments