Also visit www.atgnews.com
UPSC NDA 2 Exam 2021 परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा, परीक्षेची तारीख काय जाणून घ्या...
Notification: केंद्रीय लोक सेवा आयोग (Union Public Service Commission किंवा UPSC) नॅशनल डिफेंस अकॅडमी (NDA) आणि नौदल अकॅडमी (NA) परीक्षा (II), 2021 साठी ऑनलाइन नोटिफिकेशन जारी करणार आहे. या परीक्षेत सहभागी होण्यास इच्छुक उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन UPSC NDA 2 Exam 2021 परीक्षेचे नोटिफिकेशन पाहू शकतील. II परीक्षा (UPSC NDA 2 Exam) 2021 साठी अर्ज करण्याची अखेरची मुदत २९ जून आहे. ऑनलाइन अधिसूचना ९ जून रोजी संकेतस्थळावर जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. अधिकृत यूपीएससी परीक्षा कॅलेंडर (UPSC Exam Calendar 2021) नुसार, यूपीएससी एनडीए आणि एनए (II), 2021 परीक्षा ५ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. करोना महामारीमुळे वेळापत्रकात बदल एनडीए, एन 2 परीक्षा दरवर्षी एप्रिल आणि सप्टेंबरमध्ये आयोजित केली जाते, पण यंदा करोना महामारीमुळे (COVID19) परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या वर्षी दोन वेळा नव्हे तर केवळ एकदात ही परीक्षा होणार आहे. ऑनलाइन अर्ज कसा करायचा? उमेदवारांनी upsconline.nic.in या वेबसाइट वर जावे. होम पेज वर आवश्यक सूचना वाचल्यानंतर ऑनलाइन अर्ज करावा. आयोगाने त्या उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया उपलब्ध केली आहे, जे परीक्षेला उपस्थित राहू इच्छित नाहीत. अर्ज भरतातना उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडावे. पात्रता काय? राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या आर्मी विंगसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा संस्थेतून बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या वायूसेना आणि नौदल विंगमध्ये इंडियन नेव्हल अकॅडमीच्या १०+२ कॅडेट एन्ट्री स्कीमसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून फिजिक्स, मॅथ्स आणि केमिस्ट्री विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक. अधिक माहिती यूपीएससीच्या संकेतस्थळावर मिळेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3g2OO3X
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments