UPSCची सप्टेंबरमध्ये होणारी NDA,NA II २०२१परीक्षा स्थगित,नवे वेळापत्रक पाहा

NDA, NA II 2021: केंद्रीय लोकसेवा आयोग ( Union Public Service Commission, UPSC)ने नॅशनल डिफेंस अॅकेडमी (NA) (II) परीक्षा स्थगित केली आहे. ही परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार होती. पण आता याची तारीख पुढे ढकलण्यात आली आाहे. यासंदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. यानुसार करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर NDA आणि NA (II)2021परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला जाणार आहे. यानुसार ५ सप्टेंबरला होणारी ही परीक्षा १४ नोव्हेंबरला होणार आहे. परीक्षेत सहभागी होणारे उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन पाहू शकतात. बातमीखाली याची लिंक देण्यात आली आहे. परीक्षेसाठी अर्ज भरण्याची तारीख- ९ जून २०२१ नोंदणी करण्याची शेवटची तारीख- २९ जून २०२१ (सेकंड) २०२१ परीक्षेची तारीख- १४ नोव्हेंबर २०२१ केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी मिळणार आहे. यूपीएससीने आपल्या वेबसाइटवर यासंदर्भात लिंक दिली आहे. NDA (II) २०२१ परीक्षा ४१ परीक्षा केंद्रांवर होणार होती. पण आता त्यासाठी ७५ केंद्र करण्यात आले आहेत. फीस किती असेल ? UPSC ने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार सामान्य आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी एनडीए २०२१ अर्ज पत्र भरण्यासाठी १०० रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. तर एससी/एसटी उमेदवारांना नोंदणी शुल्कात सवलत देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35Jd19D
via IFTTT

Post a Comment

0 Comments