Also visit www.atgnews.com
हजारो पालकांना सरकारचा मोठा दिलासा; खासगी शाळांची १५ टक्के शुल्ककपात होणार
करोना काळात आर्थिक कंबरडे मोडलेल्या हजारो पालकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. खासगी शाळांच्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. यानुसार करोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर खासगी शाळांचे शुल्क १५ टक्के कमी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अध्यादेश लवकरच जारी करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टानेही काही दिवसांपूर्वी खासगी शाळांच्या शुल्कसंदर्भात सरकारला महत्वाचे निर्देश दिले होते. खासगी शाळांचे शुल्क कमी करण्यात यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही प्रसारमाध्यमांना माहिती दिली होती. शिवाय मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ववत होणार अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शाळांची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दूरदृष्यप्रणाली मार्फत झालेल्या बैठकीच्या माध्यमातून घेतली. क्षतीग्रस्त शाळांच्या दुरुस्तीचे नियोजन करून तेथे लवकरात लवकर शिक्षण सुरु करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बैठकीत उपस्थित शालेय शिक्षण अधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांच्या नुकसानासंबंधी माहिती दिली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3f8Gejd
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments