पावसामुळे JEE Main हुकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ३ आणि ४ ऑगस्टला

जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात जेईई मेन परीक्षेची उत्तरतालिका लवकरच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा पाऊस,पुरामुळे हुकली त्यांच्यासाठी देखील पुनर्परीक्षेच्या तारखा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केल्या आहेत. या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ३ आणि ४ ऑगस्ट रोजी होणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी अॅडमिट कार्ड २९ जुलै रोजी jeemain.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येतील. एनटीएने यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकानुसार, कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पावसामुळे २५ आणि २७ जुलै रोजी झालेली जेईई मेन सत्र ३ परीक्षा देता आली नाही त्यांनी त्यांच्या फेरपरीक्षेसाठी फ्रेश अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावेत. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची समस्या किंवा तक्रार असेल ते एनटीएशी - ०११- ४०७५९००० या क्रमांकावर किंवा jeemain@nta.ac.in या इमेलवर संपर्क साधू शकतात. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेने इंजिनीअरिंग प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्स या परीक्षेला बसू न शकणाऱ्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. हे विद्यार्थी पुनर्परीक्षा देऊ शकणार आहेत. राज्यातील कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, सांगली आणि सातारा या भागात झालेल्या पुरामुळे २२ ते २७ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या जेईई मेन्सच्या तिसऱ्या सत्रासाठी अनेक विद्यार्थ्यांना बसता आले नाही. जे विद्यार्थी या सत्रात परीक्षा देऊ शकणार नाही त्यांना संधी दिली जाणार असलयाचे राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेने स्पष्ट केले होते. या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षेचे आयोजन केले जाईल असेही त्यांनी सांगितले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी याबाबत टि्वट करून ही माहिती दिली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3f7Z75M
via IFTTT

Post a Comment

0 Comments