सीबीएसई बारावीच्या ६५ हजार विद्यार्थ्यांचा शिल्लक निकाल ५ ऑगस्टला होणार जाहीर

CBSE Class 12th Results 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE)ने शुक्रवारी बारावीचे निकाल जाहीर केले. यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनी बाजी मारली. साधारण ७० हजार विद्यार्थिनींना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. दरम्यान अजूनही आपल्या निकालाची वाट पाहत आहेत. बोर्ड रिझल्ट संदर्भात एका अधिकाऱ्याने महत्वाची माहिती दिली. साधारण ६५ हजार विद्यार्थ्यांचे निकाल तयार झाले असून ५ ऑगस्टला हे निकाल जाहीर केले जाणार असल्याचे ते म्हणाले. सीबीएसई बोर्डाची परीक्षा करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार हा रिझल्ट जाहीर करण्यात आला. सीबीएसईने बारावी बोर्ड २०२१ साठी १३ लाख ६९ हजार ७४५ रेग्युलर विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. यातील १३ लाख ४ हजार ५६१ विद्यार्थ्यांच्या निकालाची घोषणा करण्यात आली. १२ लाख ९६ हजार ३१८ विद्यार्थी पास झाले आहेत. तर ६५ हजार १८४ विद्यार्थ्यांचा निकाल अद्याप बाकी आहे. देशभरातून एकूण १४ लाख ३० हजार १८८ विद्यार्थ्यांनी सीबीएसई बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १३ लाख ६९ हजार ७४५ विद्यार्थी नियमित तर ६० हजार ४४३ विद्यार्थी खासगीरित्या नोंदणीकृत होते. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. खासगी विद्यार्थ्यांची परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. एकूण १३ लाख ४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. यापैकी १२ लाख ९६ हजार ३१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ९९.३७ आहे. तसेच १५०१५२ विद्यार्थ्यांना ९० ते ९५ टक्के गुण मिळाले असून ७०००४ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. यावर्षी ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. बारावीमध्ये ९९.६७ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचे पास होण्याचे प्रमाण ९९.१३ टक्के आहे. असा तपासा निकाल - बोर्डाच्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा. - सीबीएसई रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा. -या पेजवर दहावी आणि बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. - मागितलेली माहिती भरुन लॉगिन करा. -तुमचा रिझल्ट स्क्रिनवर दिसेल. इथे विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. -भविष्यातील उपयोगासाठी याची प्रिंट घेऊन ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j61sQ2
via IFTTT

Post a Comment

0 Comments