CA Exam: कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आणि कसा असेल ऑप्ट आऊटचा पर्याय?

CA July Exam 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India) ने सीए जुलै परीक्षा २०२१ मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्ट आऊटच्या पर्यायासंदर्भात एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यानुसार, ज्या उमेदवारांना १५ एप्रिला २०२१ किंवा त्यानंतर कोविड-१९ संसर्ग झाला आहे, त्यांना ऑप्ट आऊट सुविधेचा लाभ घेता येऊ शकेल. अशा प्रकरणात, जुलै परीक्षेला एक अटेम्प्ट म्हणून मानले जाणार नाही. आयसीएआयने जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये पुढे असे म्हटले आहे की जर कोणा परीक्षार्थीला जुलै २०२१ च्या परीक्षेत की परीक्षेत सहभागी होण्यादरम्यान COVID-19 ची लागण झाली आणि त्याला उर्वरित विषयांची परीक्षा देता आली नाही, तरी देखील असा उमेदवाराला ऑप्ट आऊट पर्याय लागू होईल. जुलै २०२१ च्या परीक्षेला अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत अटेम्प्ट मानला जाणार नाही. उमेदवारांनी याकडेही लक्ष द्यावे, की जर परीक्षेदरम्यान कोणत्याही पेपरला उमेदवाराने ऑप्ट आऊट केले आहे, तर त्याला उर्विरित पेपर देण्याची अनुमती नसेल. अलिकडेच सुप्रीम कोर्टात सीए परीक्षा स्थगित करण्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्या.ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. अनुराधा बोस यांच्या खंडापीठाने आयसीएआयला ५ जुलैपासून सीए परीक्षांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. यासह विद्यार्थ्यांना RT-PCR टेस्ट शिवाय ऑप्ट आऊटचा पर्याय देण्यास सांगितले आहेत. यापूर्वी आयसीएआयने जुलै २०२१ परीक्षांसाठी ऑप्ट आऊटचा पर्याय घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा RT-PCR टेस्ट अहवाल बंधनकारक केला होता. नियोजित वेळापत्रकानुसार, सीए इंटर आणि फायनल परीक्षा ५ जुलै ते २० जुलै या कालवधीत होणार आहेत. या परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड जारी झाले आहे. सुमारे ३.७४ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षांसाठी अर्ज केला आहे. या परीक्षांसंबंधीची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी उमेदवार अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wbtPkl
via IFTTT

Post a Comment

0 Comments