Online Courses:ऑनलाईन कोर्सचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या

Online Courses: ऑनलाईन कोर्स जितका फायदेशीर आहे तितका नुकसान देणारा देखील ठरु शकतो. पण फायदा आणि नुकसान या दोन्हीसाठी विद्यार्थी स्वत: जबाबदार ठरतो. ऑनलाईन कोर्स करुन एकीकडे तुम्ही आपले स्किल्स वाढवता तर दुसरीकडे वेळखाऊ आणि आळशीपणाचे शिकार होऊ शकता. ऑनलाईन कोर्समुळे होणारे फायदे आणि नुकसान जाणून घ्या. नेहमी उपलब्ध ऑनलाईन शिकवणीत तुमचे शिक्षक तुम्हाला सातही दिवस २४ तास उपलब्ध असतात. तुम्ही त्यांच्याकडून लेक्चर मिळवू शकता, नोट्स मागू शकता, असाईनमेंट तपासू शकता, अभ्यासाचे प्रश्नोत्तरे घेऊ शकता, प्रश्नांवर चर्चा करु शकता, आपल्या सहकाऱ्यांसोबत चॅट करु शकता आणि तुमच्या वेळेप्रमाणे अभ्यास करु शकता. मित्रांचा सहभाग ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक, मित्रवर्ग देखील सहभागी होऊ शकतात. विद्यार्थी जेव्हा इंटरनेटवर काही शोधत असतात तेव्हा आईवडीलांचे लक्ष राहते. आपला परिवार आणि मित्रांची मदत मिळाल्याने मुलांना यशस्वी होण्यास मदत होते. लवचिकता ऑनलाईन कोर्स हा लवचिक आहे. म्हणजे तुम्ही वाटेल तेव्हा अभ्यास करु शकता. पाहीजे त्याच्यासोबत राहून अभ्यास करु शकता. तुम्ही तुमच्या आवडीचा ड्रेसअप करु शकता. स्किल्स वाढतात ऑनलाईन कोर्स प्रत्यक्ष जगातील स्किल्स शिकवतात. तुम्ही ऑनलाईन कोर्स पूर्ण कराल तेव्हा तांत्रिक कौशल्याच्या रुपात ईमेल आणि वेब ब्राऊजिंग देखील दाखवू शकता. इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळवणे, त्यातून शिकणे हे तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यातील संधी खुल्या करते. तुम्हाला ऑनलाईन नोकरी मिळू शकते, कॉलेजचे अर्ज ऑनलाईन मिळवू शकता. इतर अनेक कामे करु शकता. ऑनलाईन वर्गाचे नुकसानवेळ ऑनलाईन क्लासमध्ये ऑफलाईन क्लासपेक्षा जास्त वेळ लागतो. ऑन कॅम्पसमध्ये त्यापेक्षा कमी वेळ लागतो. कारण तिथे त्याप्रमाणे वातावरण असते. तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष शिक्षक किंवा मित्रांना भेटून शंका निरसन करता. पण इथे तुम्हाला शंका असल्यास मेसेज टाइप करुन संवाद साधावा लागतो. तुम्ही लिहिलेले वाचण्या किंवा ऐकण्यासाठी जास्त वेळ जातो. इंटरनेट ऑनलाईन कोर्स अधिक शिथिल असतो. एखादा विद्यार्थ्यालाऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होण्यास उशीर होऊ शकतो. कारण इथे वर्गात वेळेत यायचं असं म्हणणारं नाहीय. असाइनमेंट वेळेत पूर्ण करा, परीक्षा जवळ आल्या आहेत असं वारंवार सांगणारे कोणी नसते. तुम्हाला कोणी उपदेश देत नाही. ऑनलाईन वातावरणात अभ्यास करुन असाइनमेंट टाळणे शक्य असते. वेळेचे नियोजन ऑनलाईन क्लासमध्ये शिकताना वेळेचे नियोजन असणे गरजेचे आहे. ही तुमच्या ऑनलाईन कोर्सची गरज आहे. तुम्हाला व्यक्तिगत वेळेचे कौशल्य अवगत करावे लागेल. ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी स्वयंशिस्तीची गरज असते. तुम्हाला तुमचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढावा लागेल. वर्गाप्रमाणे संवाद नाही ऑनलाईन क्लासमध्ये तुमच्यासोबत कोणी नसतं. कॉम्प्युटर हाच तुमचा सोबती असतो. पण कॅम्पसमध्ये तुमच्या आजुबाजूला विद्यार्थी मित्र असतात. शिस्त शिकवणारे शिक्षक असतात. पण ऑनलाईन कोर्समध्ये असे काही नसते. अॅक्टीव्ह लर्नर ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला अॅक्टीव्ह लर्नर बनावे लागेल. यामध्ये केवळ तुम्हीच तुमच्या शिक्षणास जबाबदार आहात. तुमच्याकडून कोणी अभ्यास करवून घेणार नाही. स्वप्न पूर्ण करण्याची ठिणगी तुमच्यात असायला हवी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3h7wya5
via IFTTT

Post a Comment

0 Comments