Also visit www.atgnews.com
CBSE 10th Result Date: सीबीएसई दहावी रिझल्ट कधी? परीक्षा नियंत्रकांनी दिली माहिती
Date: सीबीएसई बोर्ड बारावी रिझल्ट जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा देखील लवकरच संपणार आहे. यासंदर्भात परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी महत्वाची माहिती दिली आहे. सीबीएसई बारावी रिझल्ट जाहीर झाल्यानंतर आता दहावी रिझल्टच्या दृष्टीने तयारी सुरु झाली आहे. पुढच्या आठवड्यात रिझल्ट जाहीर होईल यासाठी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. सीबीएसई बोर्ड दहावीचा रिझल्ट तपासण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जायला हवे. यानंतर २०२१ च्या होमपेजवर सीबीएसई रिझल्ट २०२१ क्लास १० च्या लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर रोल नंबर, शाळा, केंद्र क्रमांक आणि हॉल तिकिट नंबर टाकावा लागेल. सबमिट बटणावर क्लिक करा. ऑनलाइन सीबीएसई दहावीचा निकाल स्क्रिनवर दिसेल. यानंतर दहावीचा निकाल डाऊनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढून ठेवा. अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने हा निकाल लावण्यात आला आहे. त्यामुळे बोर्डाकडून यंदा मेरीट लिस्ट जाहीर होणार नाही. गेल्यावर्षीच्या परफॉर्मन्सच्या आधारे ९० टक्के आणि त्यापेक्षा पुढच्या श्रेणीतील २ लाखाहून अधिक विद्यार्थी असू शकतात. वर्ष २०२०मधील रिझल्ट वर्ष २०२० मध्ये ४१ हजार ८०४ विद्यार्थ्यांनी ९५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळविले होते. जे परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थी संख्येच्या २.२३ टक्के होते. याव्यतिरिक्त एकूण पास होण्याची टक्केवारी ९१.४६ टक्के आहे. यामध्ये मुलींची पास होण्याची टक्केवारी ९३.३१ टक्के आहे. तर मुलांची पास होण्याची टक्केवारी ९०.१४ टक्के होती.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rJvRaE
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments