IIST Courses: अवकाश संशोधनातील भरारी

आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक अवकाश संशोधनामध्ये भारतही आज आपला ठसा उमटवत आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना या विषयाची ओढ वाटत आहे. मात्र वैद्यकीय-अभियांत्रिकी क्षेत्राप्रमाणे या क्षेत्राची माहिती सरसकट सगळ्यांना नसते. 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी' ही आशिया खंडातील तसेच जगातील अंतराळ या विषयाची पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम उपलब्ध असणारी पहिली संस्था. या अभ्यासक्रमांचा भर हा अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि उपयोजन यावरच आहे. या संस्थेची स्थापना २००७ साली झाली. वर्षभराच्या कालावधीतच या संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला. केंद्र सरकारच्या अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्था म्हणून आय.आय.एस.टी. कार्य करते. या संस्थेचे उद्दिष्ट देशभरात विज्ञान शाखेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना 'इस्रो'साठी (इंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशन, ) शास्त्रज्ञ/अभियंते म्हणून काम करण्यासाठी तयार करणे, हे आहे. 'इस्रो'चे अध्यक्ष हे या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. देशभरातील महत्त्वाच्या शासकीय संशोधन संस्था तसेच आयआयटीचे संचालक या संस्थेच्या संचालक मंडळावर आहेत. अंतराळ संशोधन या विषयाची व्याप्तीदेखील मोठी आहे. विविध ज्ञानशाखांमधील शास्त्रज्ञ अंतराळ संशोधनासाठी आवश्यक असतात. या संस्थेत उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत माहिती घेऊ या. पदवी अभ्यासक्रम बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजीनिअरिंग (एव्हिऑनिक्स) - बी.टेक. (एरोस्पेस इंजीनिअरिंग) - दुहेरी पदवी (बी.टेक. + मास्टर ऑफ सायन्स / मास्टर ऑफ टेक्नोलॉजी) - या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना इंजीनिअरिंग फिजिक्समधील बी.टेक. पदवी मिळते. तसेच खालील चार शाखांपैकी एका शाखेतून एम.एस्सी. किंवा एम.टेक. ही पदव्युत्तर पदवी मिळते. एकूण अभ्यासक्रम १० सत्रांमध्ये विभागलेला आहे.पहिली सहा सत्रे (सेमिस्टर्स) सर्व विद्यार्थ्यांना सामायिक असून सातव्या सत्रापासून विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचा विषय निवडावा लागतो. एम.एस्सी. (अ‍ॅस्ट्रोनॉमी व अ‍ॅस्ट्रोफिजिक्स) एम.एस्सी (अर्थ सिस्टिम सायन्स) एम.एस्सी.( सॉलिड स्टेट फिजिक्स) एम.टेक. (ऑप्टिकल इंजीनिअरिंग) प्रवेश प्रक्रिया आय.आय.एस.टी.मधील पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश हे जे.ई.ई. (अ‍ॅडव्हान्सड) या आय.आय.टी.साठी असलेल्या प्रवेश परीक्षेच्या गुणांनुसार दिले जातात. शैक्षणिक पात्रता पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बारावी बोर्ड वा समकक्ष परीक्षांमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित विषय अनिवार्य) किमान ७५ टक्के सरासरी गुण (राखीव वर्गासाठी व दिव्यांगांसाठी ६५ टक्के) मिळवून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिक्षणाचा सर्व खर्च (निवास व खाणे वगैरे) भागवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना असिस्टंटशिपची सुविधा दिली जाते. असिस्टंटशिपची सुविधा ही विद्यार्थ्यांच्या त्या त्या सत्रातील शैक्षणिक कामगिरीवर आधारित असते. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामगिरीच्या आधारे इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ किंवा अभियंता (इंजीनिअर) म्हणून सामावून घेतले जाते. पदव्युत्तर अभ्यासक्रम एरोस्पेस इंजिनीअरिंग विभाग - एम.टेक. इन थर्मल अ‍ॅण्ड प्रॉप्लशन एम.टेक. इन एरोडायनॅमिक्स अ‍ॅण्ड फ्लाईट मेकॅनिक्स एम. टेक. इन स्ट्रक्चर्स अ‍ॅण्ड डिझाइन एव्हिऑनिक्स एम.टेक. इन रेडिओ फ्रिक्वेन्सी अ‍ॅण्ड मायक्रोवेव्ह इंजीनिअरिंग एम.टेक. इन डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग एम.टेक. इन व्ही.एस.एल.आय. अँड मायक्रोसिस्टिम्स एम.टेक. इन कंट्रोल सिस्टिम्स एम.टेक. इन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स गणित एम.टेक. इन मशिन लर्निंग अँड कॉम्प्युटिंग रसायनशास्त्र एम.टेक. इन मटेरियल्स सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी भौतिकशास्त्र एम.टेक. इन ऑप्टिकल इंजीनिअरिंग एम.टेक इन सॉलिड स्टेट टेक्नोलॉजी अर्थ (Earth)अ‍ॅण्ड स्पेस सायन्सेस एम.टेक. इन अर्थ सिस्टिम सायन्स एम.टेक. इन जिओइन्फोर्मेटिक्स मास्टर ऑफ सायन्स इन अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी संबंधित विषयातील अभियांत्रिकीचे पदवीधर किंवा बेसिक सायन्समधील पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी पात्र असतात. ग्रॅज्युएट अप्टिट्यूड टेस्ट इन इंजीनिअरिंग (GATE), जॉईंट एन्ट्रन्स स्क्रिनिंग टेस्ट (JEST), युजीसी - नेट (UGC - NET) / (CSIR - NET) आदी प्रवेश परीक्षांतील गुणांनुसार अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BSpsyy
via IFTTT

Post a Comment

0 Comments