Cbse 12th Result: पंतप्रधान मोदींकडून सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांचे कौतुक

Result: बारावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटसोबतच, डिजिलॉकर, एसएमएस, उमंग अॅपच्या माध्यमातून पाहता येत आहे. बारावीमध्ये ९९.६७ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचे पास होण्याचे प्रमाण ९९.१३ टक्के आहे. दरम्यान यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. तसेच त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली. परीक्षा पास झालेल्या माझ्या तरुण मित्रांचे अभिनंदन. तुमच्या उज्ज्वल, आनंदी आणि निरोगी भविष्यासाठी शुभेच्छा.ज्यांना वाटते की जास्त मेहनत केली असती तर आणखी निकाल चांगला लागला असता, त्यांनी आपल्या अनुभवाातून शिका. आपली मान उंच करा. एक उज्ज्वल आणि संधींनी भरलेले भविष्य तुमची वाट पाहत आहे. तुमच्यातील प्रत्येकजण प्रतिभेचा उर्जास्थान आहे. माझ्या नेहमी शुभेच्छा असतील असे ते म्हणाले. यावर्षी बारावीच्या बोर्डासाठी असलेल्या बॅचने अभूतपूर्व परिस्थिती पाहिली. शिक्षण क्षेत्राने गेल्या वर्षभरात अनेक बदल पाहिले. तरीही, त्यांनी नवीन सामान्य परिस्थितीशी जुळवून घेतले आणि त्यांचे सर्वोत्तम दिले. त्यांचा अभिमान असल्याचे पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, सीबीएसई बोर्डातर्फे एकूण १३ लाख ४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. यापैकी १२ लाख ९६ हजार ३१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ९९.३७ आहे. तसेच १५०१५२ विद्यार्थ्यांना ९० ते ९५ टक्के गुण मिळाले असून ७०००४ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. यावर्षी ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. बारावीमध्ये ९९.६७ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचे पास होण्याचे प्रमाण ९९.१३ टक्के आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ldAzfQ
via IFTTT

Post a Comment

0 Comments