CBSE 12th Result: ७० हजारांवर विद्यार्थ्यांनी कमावले ९५ टक्क्यांहून अधिक गुण

12th Result: सीबीएसईने बारावी २०२१ च्या निकालाची घोषणा केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) ने cbseresults.nic.in लिंकवर निकाल जाहीर केला आहे. सीबीएसईने बारावी बोर्ड २०२१ साठी १३ लाख ६९ हजार ७४५ रेग्युलर विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. यातील १३ लाख ४ हजार ५६१ विद्यार्थ्यांच्या निकालाची घोषणा करण्यात आली. १२ लाख ९६ हजार ३१८ विद्यार्थी पास झाले आहेत. तर ६५ हजार १८४ विद्यार्थ्यांचा निकाल अद्याप बाकी आहे. दरम्यान किती विद्यार्थ्यांना ९० ते ९५ टक्क्क्यांदरम्यान गुण मिळाले? किती विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले? ट्रान्सजेंडर्सचा निकाल काय लागला? यंदा मुलींचा रिझल्ट किती लागला? याची माहिती जाणून घ्या. देशभरातून एकूण १४ लाख ३० हजार १८८ विद्यार्थ्यांनी सीबीएसई बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १३ लाख ६९ हजार ७४५ विद्यार्थी नियमित तर ६० हजार ४४३ विद्यार्थी खासगीरित्या नोंदणीकृत होते. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. खासगी विद्यार्थ्यांची परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. एकूण १३ लाख ४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. यापैकी १२ लाख ९६ हजार ३१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ९९.३७ आहे. तसेच १५०१५२ विद्यार्थ्यांना ९० ते ९५ टक्के गुण मिळाले असून ७०००४ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. यावर्षी ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. बारावीमध्ये ९९.६७ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचे पास होण्याचे प्रमाण ९९.१३ टक्के आहे. परीक्षा रद्द झाल्याने यावेळी बोर्डातर्फे मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली नाही. टॉपर्सची घोषणाा देखील झाली नाही. बऱ्याचदा हेवी ट्रॅफीक आणि लोडमुळे सीबीएसई वेबसाइट क्रॅश होते आणि विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. पण आता अशी काळजी करण्याची गरज नाही. वेबसाइटव्यतिरिक्त सीबीएसई बारावीचे विद्यार्थी इतर अनेक पद्धतीने निकाल पाहू शकतात. एसएमएस, उमंग अॅप आणि डिजिलॉकरच्या माध्यमातून निकाल पाहता येऊ शकतो. असा तपासा निकाल - बोर्डाच्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा. - सीबीएसई रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा. -या पेजवर दहावी आणि बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. - मागितलेली माहिती भरुन लॉगिन करा. -तुमचा रिझल्ट स्क्रिनवर दिसेल. इथे विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. -भविष्यातील उपयोगासाठी याची प्रिंट घेऊन ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rKaCW4
via IFTTT

Post a Comment

0 Comments