Also visit www.atgnews.com
CBSE, ICSE आणि अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी CET नोंदणी आजपासून
Registration Update: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बुधवार २८ जुलै पासून सीबीएसई, आयसीएसई बोर्डातून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अकरावी सीईटीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्य मंडळातून २०२१ पूर्वी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही नोंदणी करता येणार आहे. अकरावी सीईटीसाठी राज्य मंडळातून २०२१ मध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना २६ जुलैपासून अर्ज नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यासाठी या विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नव्हते. परंतु, सीबीएसई व आयसीएसई बोर्ड दहावी उत्तीर्ण तसेच २०२१ पूर्वी राज्य मंडळातून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना १७८ रुपये भरून अर्ज नोंदणी करावी लागणार आहे. आज दुपारी तीन वाजल्यापासून https://ift.tt/3y8QiQW या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचण आल्यास मदतीसाठी राज्य मंडळामार्फत ९८२३००९८४१ हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक विभागासाठी हेल्पलाइनची सुविधाही मंडळाने दिली आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक, परीक्षेचे माध्यम ही महिती अचूक पद्धतीने नोंदविणे गरजेचे आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांगत्वाचा प्रकार नमूद करून त्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. या विद्यार्थ्यांना सोमवार, दोन ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. ...तर अर्ज पुन्हा भरावा लागेल यापूर्वी २० जुलैला राज्य माध्यमिक मंडळाने एका दिवसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली होती, तेव्हा वेबसाइट क्रॅश झाल्याने काही विद्यार्थ्यांचे अर्ज ‘सबमिट’ झाले, तर काहींची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज संगणक प्रणालीत दिसत आहेत, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही; पण ज्यांचे अर्ज प्रणालीत दिसत नाहीत, अशांना पुन्हा अर्ज करावा लागणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ViZGCH
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments