CBSE: नववी ते बारावीचा रिवाइज्ड टर्म अभ्यासक्रम जाहीर, असा तपासा

Board Exams 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE)ने इयत्ता नववी ते बारावीसाठी रिवाइज्ड टर्म वाइज अभ्यासक्रम जाहीर केला आहे. हे शैक्षणिक सत्रामध्ये २०२१-२२ पासून टर्म प्रमाणे अभ्यासक्रम लागू होणार आहे. सर्व विषयांचा पूर्ण अभ्यासक्रम अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in वर उपलब्ध आहे. बोर्डाने याआधी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी नव्या योजनेची घोषणा केली. वर्षाच्या अखेरिपर्यंत बोर्ड परीक्षेशिवाय शैक्षणिक वर्ष दोन सत्रांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक सत्राच्या शेवटी बोर्ड परीक्षा होणार आहे. कोर्स कंटेटशिवाय या अभ्यासक्रमात दोन बोर्ड परीक्षा धोरणाच्या आधारे विद्यार्थ्यांच्यां मूल्यमापनाचे निकष ठरवण्यात येणार आहेत. टर्म I ची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये आयोजित केली जाणार आहे. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. जे रॅशनलाइज्ड अभ्यासक्रमाच्या पहिल्या भागावर असतील. या परीक्षेला ९० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. सीबीएसईतर्फे शाळांना प्रश्न पत्रिका आणि गुणांची स्किम पाठविण्यात येईल. ही परीक्षा बाहेरचे शिक्षक आणि पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली होईल. टर्म II ही परीक्षा बोर्डाने निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रावर मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा दोन तासांची असेल. त्यावेळची स्थिती परीक्षांसाठी अनुकूल नसेल तर टर्म II ही परीक्षा ९० मिनिटांच्या बहुपर्यायी पेपरच्या रुपात होणार आहे. दहावी-बारावीचा निकाल तयार सीबीएसईतर्फे दहावी आणि बारावीचा निकाल टॅब्युलेशन पॉलिसीनुसार तयार करण्यात आला आहे. आता बोर्डातर्फे लवकरच कोणत्याही दिवशी निकालाची तारीख जाहीर केली जाऊ शकते. विद्यार्थ्यांना बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. डिजिलॉकरच्या माध्यमातून देखील निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टीकलच्या परीक्षांवेळी देण्यात आलेल्या रोल नंबरच्या माध्यमातून हे निकाल पाहता येऊ शकतात. तसेच डिजिलॉकरवर विद्यार्थ्यांना आपली गुणपत्रिका पाहता येणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लावताना दहावी, अकरावी आणि बारावीच्या यूनिट टेस्ट, मिड टर्म आणि प्री बोर्ड परीक्षांचे गुण ग्राह्य धरले गेले आहेत. यानुसार दहावी आणि अकरावीच्या गुणांची वेटेज ३०-३० टक्के आणि बारावीच्या गुणांची वेटेज ही ४० टक्के आहे. याचप्रमाणे दहावीच्या निकालासाठी ५ मधील सर्वोत्तम ३ विषयांचे गुण ग्राह्य धरले गेले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lbRsXU
via IFTTT

Post a Comment

0 Comments