CBSE: सीबीएसई बारावीचा निकाल कशा पद्धतीने तयार होणार? जाणून घ्या

12th Board Result 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डातर्फे शुक्रवारी दुपारी २ वाजता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सीबीएसईतर्फे बारावीचा निकाल अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर जाहीर केला जाणार आहे. यावेळी परीक्षा न झाल्याने हॉल तिकिट देण्यात आले नव्हते. अशावेळी विद्यार्थ्यांना रोल नंबर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सीबीएसईने दिलेल्या लिंकच्या माध्यमातून रोल नंबर पाहू शकता. सीबीएसई बारावीचा निकाल कशा पद्धतीने तयार होणार याबद्दल माहिती घेऊया. बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लावताना दहावी, अकरावी आणि बारावीच्या यूनिट टेस्ट, मिड टर्म आणि प्री बोर्ड परीक्षांचे गुण ग्राह्य धरले गेले आहेत. यानुसार दहावी आणि अकरावीच्या गुणांचे वेटेज ३०-३० टक्के आणि बारावीच्या गुणांची वेटेज ही ४० टक्के आहे. याचप्रमाणे दहावीच्या निकालासाठी पाचमधील सर्वोत्तम ३ विषयांचे गुण ग्राह्य धरले गेले आहेत. बोर्डातर्फे शाळांना २२ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणांचा रेकॉर्ड भरण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर ही तारीख वाढवून २५ जुलै करण्यात आली. कोणत्याही शाळेने फॉर्मुलेशननुसार गुण अपलोड केले नसतील तर त्यांना संधी मिळावी यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली. तसेच बोर्डातर्फे तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली. शाळांना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास ते हेल्प डेस्कच्या मदतीने गुण अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करु शकतील यासाठी हेल्प डेस्क सुरु करण्यात आला होता. असा तपासा निकाल सीबीएसईतर्फे आज दुपारी २ वाजता बारावी निकाल २०२१ ची घोषणा झाल्यानंतर वर दिल्या गेलेल्या अधिकृत वेबसाइटवर जा. याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. सीबीएसई रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा. या पेजवर दहावी आणि बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. मागितलेली माहिती भरुन लॉगिन करा. तुमचा रिझल्ट स्क्रिनवर दिसेल. इथे विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. भविष्यातील उपयोगासाठी याची प्रत राखून ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fc6toR
via IFTTT

Post a Comment

0 Comments