FYJC CET अर्जात दुरुस्तीसाठी विंडो खुली, २ ऑगस्टपर्यंत मुदत

राज्यातील अकरावी प्रवेशांसाठी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (FYJC CET 2021) अर्जांमध्ये दुरुस्तीसाठी ३१ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून विंडो ओपन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जात काही दुरुस्ती करावयाची असेल, तर ती ३१ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत करता येणार आहे. कोणत्या प्रकारचा बदल वा दुरुस्ती करता येणार? - ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक - परीक्षेचे माध्यम, सेमी इंग्रजीचा विकल्प, सामाजिक शास्त्रे या विषयाच्या प्रश्नांचे माध्यम - विद्यार्थ्यांचा तात्पुरता किंवा कायमच्या निवासस्थानाचा पत्ता, त्यानुसार परीक्षा केंद्रासाठी निवडलेला जिल्हा, तालुका किंवा शहराचा विभाग - प्रवर्ग कशी करता येईल दुरुस्ती? - अकरावी सीईटीच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर आपला अॅप्लिकेशन क्रमांक आणि मोबाइल क्रमांक वापरून लॉग इन करावे. -नंतर एडिट ऑप्शन (Edit Option) वर क्लिक करून भरलेल्या माहितीत दुरुस्ती करता येईल. - आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर दुरुस्तीसह फॉर्म सबमिट करावा. एकाहून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज डिलीट करता येणार काही विद्यार्थ्यांनी एकाहून अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास आले आहे. अशा विद्यार्थ्यांनी योग्य ते एकच आवेदनपत्र ठेवून अन्य अर्ज डिलीट करण्याची सुविधा १ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा देखील २ ऑगस्ट २०२१ पर्यंत उपलब्ध राहील. विद्यार्थ्यांनी हे ध्यानात घ्यावे की संगणक प्रणालीत एकच योग्य अर्ज असल्याची खातरजमा करावी आणि अन्य अधिकचे अर्ज डिलीट करावेत. अर्जातील दुरुस्तीसंदर्भातील मंडळाचे परिपत्रक पुढीलप्रमाणे - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अकरावी सीईटीसाठी अर्ज प्रक्रियेला २० आणि २१ जुलै तसेच २४ जुलै पासून अर्ज स्वीकारायला सुरुवात केली आहे. अर्जात दुरुस्तीची सुविधा द्यावी अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून होत होती. ही मागणी लक्षात घेऊन मंडळाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BZX2mn
via IFTTT

Post a Comment

0 Comments