Also visit www.atgnews.com
'वर्क फ्रॉम होम' पण, थेट अमेरिकेतून! नाशिकच्या शिक्षिका करताहेत 'रात्रीचा दिवस'
- प्रशांत देसले स्थळ अमेरिका... इंडियाना प्रांतातील लाफेथ आणि वॉशिंग्टनजवळील सिअॅटल शहर... अमेरिकन वेळेनुसार रात्रीचे अकरा वाजलेले.... पुस्तकांची जमवाजमव करून 'त्या' आपल्या लॅपटॉपवरून गुगल मीटवर लॉगिन करतात... आणि त्याच क्षणी इकडे भारतातीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजता नाशिकमधील साधारण ४० मुले त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करीत म्हणतात 'गुड मॉर्निंग टीचर...' आणि तेथून पुढे जवळपास रोज चार ते पाच तास त्या अमेरिकेतून नाशिकच्या मुलांना ऑनलाइन शिकवतात. गेल्या चार महिन्यांपासून त्या हे रोज करीत आहेत..., तेही अगदी उत्साहाने.... नाशिकमधील फ्रवशी अॅकॅडमीतील नीलम स्वानी, कर्पगम अय्यर या दोन शिक्षिकांची ही प्रेरणादायी कहाणी.... करोनामुळे दीड वर्षापासून शालेय विद्यार्थी अनेक बदलांना सामोरे जात आहेत. सकाळी सकाळी पाठीवर दफ्तर, हातात डब्याची पिशवी, गळ्यात आयकार्ड आणि पाण्याची बाटली अडकवून सायकल, रिक्षा, व्हॅन, कार वा बसमधून शाळेच्या वाटेकडे जाणारी मुले दिसेनाशी झाली आहेत. ती आता सकाळपासून घरातील एखाद्या कोपऱ्यात मोबाइल, लॅपटॉप ऑन करून आयुष्याचे धडे गिरवत आहेत. शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहातून जाताना जितक्या अडचणी विद्यार्थ्यांना, पालकांना येताहेत तितक्याच अडचणी शिक्षकांनाही येत आहेत. मात्र, शिक्षण प्रवाहातील हे दोन्ही-तिन्ही घटक आपापल्या परीने वाट काढत आहेत आणि शिक्षणाची गंगा प्रवाही ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिक्षिका स्वानी आणि अय्यर हे त्याचे उत्तम उदाहरण. नीलम स्वानी २६ वर्षांपासून, तर अय्यर १८ वर्षांपासून नाशिकच्या फ्रवशी अॅकॅडमीत कार्यरत आहेत. स्वानी यांची मुलगी आणि जावई, तर अय्यर यांची मुलगी अमेरिकेत स्थायिक झालेली आहेत. मात्र, करोनामुळे दीड-दोन वर्षे ते एकमेकांना भेटू शकले नव्हते. सुदैवाने एप्रिल २०२१ मध्ये त्यांना अमेरिकेत जाण्याची परवानगी मिळाली. शाळेची परवानगी घेऊन या दोन्ही शिक्षिका आपल्या पतीसह तिकडे गेल्या. मात्र, तेथे गेल्यापासून अमेरिकेतील रुग्ण वाढू लागल्याने त्यांचा भारतात परतीचा प्रवास लांबला आहे. मात्र, या काळात स्वानी आणि अय्यर यांनी एकही दिवस मुलांची ऑनलाइन शाळेची वेळ चुकविलेली नाही. या दोन्ही शिक्षिकांकडे चौथीच्या एकेका तुकडीची जबाबदारी असून, इतरही वर्गांना त्या काही विषय शिकवितात. किलबिलाट... पहाटे पाचपर्यंत! 'यूएस'मधील लाफेथ शहरात स्वानी यांची मुलगी आणि जावई राहतात, तर अय्यर यांची मुलगी वॉशिंग्टनजवळील सिअॅटल शहरात राहते. लाफेथमधील टुमदार घरी नीलम स्वानी दररोज रात्री अकरा वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत आपला लॅपटॉप उघडून फ्रवशीतील मुलांना शिकवत आहेत. अय्यर यादेखील दररोज अशा प्रकारे मुलांना शिकवत आहेत. अमेरिकेतील त्यांच्या घरातील सदस्य झोपलेले असताना लॅपटॉपमधून मात्र मुलांना किलबिलाट सुरू असतो.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ygPpWt
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments