Also visit www.atgnews.com
IGNOU July 2021: आता १५ जुलैपर्यंत करा अर्ज नोंदणी
IGNOU July 2021: इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी (IGNOU)ने जुलै २०२१ साठी पुनर नोंदणी करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत वाढवली आहे. इतर उमेदवारांसाठी जुलै २०२१ सत्रामध्ये प्रवेशाची मुदत त्याच दिवशी समाप्त होईल. विद्यार्थी इग्नूची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन पुन्हा ऑनलाईन नोंदणी करु शकतात. विद्यापीठाने जून टर्म अॅण्ड परीक्षा (TEE)२०२१ साठी फॉर्म, असाइनमेंट, प्रोजेक्ट रिपोर्ट, शोध प्रबंध आणि फील्ड वर्क जनरल जमा करण्याची मुदत १ जुलैपर्यंत वाढवली आहे. जून TEE परीक्षेचा फॉर्म जमा करण्याची वेळ मुदत आधी ३० जून होती. ही आता ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. विद्यापीठाने यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली आहे. जुलै २०२१ मध्ये प्रवेशासाठी विद्यापीठाने अनुसूचित जाती / अनुसूचित जमातींच्या उमेदवारांना अर्ज शुल्कात सवलत देण्यात आली आहे. या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्टकॉपीसोबत आपला अर्ज ऑनलाइन माध्यमातून भरावा लागणार आहे. इग्नूमध्ये प्रवेश घ्यायचाय अशा विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रोग्राम्स कोर्सेसचे पर्याय आहेत. डिफरंट ओपन, डिस्टन्स लर्निंग (ODL) आणि ऑनलाईन प्रोग्रामिंग कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट www.oumarad.edu.in वर जायला हवे. पहिल्यांदाच प्रवेश घेणाऱ्यांसाठी जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर असलेल्या टॅबवर क्लिक करा. ज्या कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते निवडा. पात्रता निकष, शुल्काचा तपशील, कोर्सच्या अवधी हा सर्व तपशील वाचा. याव्यतिरिक्त, इग्नू कॉमन प्रॉस्पेक्टस आणि विद्यापीठातील नियम (कलम १०) वाचा. इग्नू कॉमन प्रॉस्पेक्टसची थेट लिंक खाली दिलेली आहे. असा करा अर्जइग्नूची अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in जा. होमपेजवर 'NEW REGISTRATION'या लिंकवर क्लिक करा. नवे पेज खुले होईल. इथे मागितलेली डिटेल्स भरुन स्वत:ला रजिस्टर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. उमेदवाराचे युझरनेम रजिस्टर्ड ई-मेल आयडी येईल. त्याच्या मदतीने लॉग इन करा. या डॉक्युमेंट्सची आवश्यकता स्कॅन केलेले पासपोर्ट साइझ फोटो (१०० केबी) स्कॅन केलेली सही (१०० केबी) वय प्रमाणित स्कॅन प्रति (२०० केबी) संबंधित एजुकेशन क्वालिफिकेशन डॉक्यूमेंट्सची स्कॅन कॉपी (२०० केबी) अनुभव प्रमाणपत्र स्कॅन करुन जात वैधता प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (लागू होत असल्यास) बीपीएल प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (२०० केबी) असणे गरजेचे आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Ar0d5Z
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments