Also visit www.atgnews.com
IIT Placement 2020-21: परदेशात काम करण्याची संधी कितपत? आयआयटी प्लेसमेंटमधून जाणून घ्या
IIT 2020-21: भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधून (IITs) होणाऱ्या प्लेसमेंटमधून नोकरी मिळण्याची अनेक तरुण वाट पाहत असतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिअरच्या अनेक वाटा या प्लेसमेंटमधून खुल्या होतात. पण यावर्षी करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर नोकरी शोधणाऱ्या विशेषत: परदेशात नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या वाट्याला निराशा आली आहे. आयआयटीमधून वर्ष २०२०-२१ साठी प्लेसमेंट पूर्ण झाल्या आहेत. पण यावर्षी संस्थेच्या आंतरराष्ट्रीय नोकरीच्या संधी कमी झालेल्या दिसल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार देशभरात साधारण २०० हून कमी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट म्हणजेच परदेशात काम करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे परदेशात नोकरीचे स्वप्न पाहणारे हजारो तरुण पुढील प्लेसमेंट किंवा संधीची वाट पाहत आहेत. व्यवहार लवकरच सुरु होईल आणि सेशनच्या सुरुवातीपर्यंत प्लेसमेंट ग्राफ सर्वसामान्य असेल. २०२०-२१ बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यावर्षी आयआयटी बॉम्बेने १५९च्या तुलने ५८ आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट मिळवल्या. २०२० मध्ये करोना आल्यानंतर आयआयटी गांधीनंगरमध्ये एकही प्लेसमेंट मिळाली नाही. तर आयआयटी कानपूर, आयआयटी दिल्ली आणि आयआयी रुडकीमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत नोकरी मिळण्याचे प्रमाण कमी दिसले. आयआयटी रुडकीमध्ये प्लेसमेंट अधिकतर वार्षिक पॅकेज १५३ लाख प्रति वर्षाने कमी होऊन ६९.०५ लाख प्रतिवर्ष झाले. याशिवाय आयआयटी मुंबईचे आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटमध्ये वार्षिक पॅकेज २०१९ आणि २०२० च्या तुलनेत कमी झाले आहे. आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंट ऑफिसरने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हे वर्ष आव्हानात्मक होतं. दुसऱ्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करणे खूप कठीण होते.करोनाने प्लेसमेंटला खूप आव्हानात्मक बनवले आहे. दरम्यान आयआयटी प्लेसमेंट २०२०-२१ ला सरासरी परिणामासह यशस्वीरित्या पूर्ण केले गेले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qG2XHP
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments