Also visit www.atgnews.com
JEE Main 2021: एप्रिल सत्र संपले, पुढील टप्पा ऑगस्टमध्ये
Exam Update: इंजीनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्सच्या तिसऱ्या सत्रातील परीक्षा मंगळवारी संपल्या. तिसऱ्या टप्प्यात विविध चार दिवशी घेण्यात येत असलेल्या या परीक्षेच्या २७ जुलै रोजी अखेरचा दिवस होता. विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच आन्सर की म्हणजेच उत्तरतालिका उपलब्ध करून देणम्यात येईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्यावतीने ही परीक्षा घेण्यात येते. यंदाचे या परीक्षेचे तिसरे सत्र हे २०, २२, २५ आणि २७ जुलै रोजी होते. भारत आणि भारताबाहेरील एकूण ३३४ शहरांत ही परीक्षा पडली. २७ जुलै रोजी या परीक्षेचा अखेरचा टप्पा आहे. ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत विद्यार्थ्यांना बहुपर्यायी स्वरुपाचे प्रश्न विचारण्यात येतात. चौथे सत्र ऑगस्टमध्ये जेईई परीक्षेचा चौथा टप्पा ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे. २६, २७, ३१ ऑगस्ट आणि १ व २ सप्टेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात चार आठवड्यांचे अंतर ठेवण्यात आले. सुमारे साडे सात लाख विद्यार्थ्यांनी या चौथ्या टप्प्यासाठी नोंदणी केली आहे. बीई आणि बी. टेकला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित यांचा समावेश असलेला पेपर द्यावा लागतो. बी.आर्च. ला प्रवेश घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन पेपर द्यावे लागतात. दोन टप्प्यामध्ये ही परीक्षा घेण्यात येते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zFaQk7
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments