मुंबई विद्यापीठाचा तृतीय वर्ष बीए सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई : मे २०२१ मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या पारंपारिक मानव्य विद्याशाखेच्या तृतीय वर्ष बीए सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल ९३.२१ टक्के लागला आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत एकूण ९ हजार ३०८ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला १४ हजार ३२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ हजार २२४ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर ९७ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ६७८ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ https://ift.tt/2eryysJ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उन्हाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने ९२ निकाल जाहीर केले आहेत. आज विद्यापीठाने तृतीय वर्ष बीए समवेत बीई (केमिकल इंजिनियरिंग ) सत्र ८, बीई (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनियरिंग ) सत्र ८ असे एकूण तीन निकाल जाहीर केले आहेत. दृष्टिक्षेपात निकाल - नोंदणी केलेले विद्यार्थी - १४,३२१ परीक्षेला उपस्थित विद्यार्थी - १४,२२४ परीक्षेला अनुपस्थित विद्यार्थी - ९७ उत्तीर्ण विद्यार्थी - ९,३०८ अनुत्तीर्ण विद्यार्थी - ६७८ निकालाची एकूण टक्केवारी - ९३.२१


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iUIn3e
via IFTTT

Post a Comment

0 Comments