JMI Entrance Exam: जामिया मिलिया इस्लामियामध्ये यूजी आणि पीजी कोर्ससाठी प्रवेश परीक्षा सुरु

JMI : () च्या विविध परीक्षा केंद्रांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम (पीजी), पदवी (यूजी), डिप्लोमा आणि पीडी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. २८ ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरु राहणार आहे. मास्टर ऑफ फाइन आर्ट्स (एमएफए) आणि ब्रॉडकास्ट टेक्नोलॉजीमध्ये पीजी डिप्लोमासाठी प्रवेश परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्यात आली. दुपारच्या सत्रात बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स (बीएफए-अप्लाइड आर्ट्स), एम.ए. कनफ्लिक्ट एनालिसिस अॅण्ड पीस बिल्डिंग, एम.टेक कम्युटेशनल मॅथ्स आणि उर्दू मास मीडियामध्ये पीजी डिप्लोमासाठी प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेश परीक्षेदरम्यान करोना प्रतिबंध नियमांच्या निर्देशांचे पालन करण्यात आले होते. करोना काळात देखील परीक्षा वेळेत सुरु झाल्याने जामियाच्या कुलगुरु प्रो. नजमा अख्तर यांनी समाधान व्यक्त केले. प्रवेश परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व डीन तसेच परीक्षेशी संबंधित इतर शिक्षक, परीक्षा नियंत्रक आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नांचे कौतुक केले. उमेदवारांची जास्त संख्या असलेल्या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा नवी दिल्लीशिवाय इतर शहरात घेतली जाणार आहे. यामध्ये तिरुवनंतपुरम, लखनऊ, पटणा, कोलकाता, श्रीनगर आणि गुवाहाटी येथील परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. दिल्ली विद्यापीठामध्ये पीजी, एमफिल आणि पीएचडी प्रवेशासाठी नोंदणी सुरु दिल्ली विद्यापीठाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार दिल्ली विद्यापीठ प्रवेश परीक्षा (डीयूईटी) आधारित कोर्सेससाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. पदवी अंतर्गत कोर्सेसमध्ये प्रवेश (DU Admission 2021) घेण्यासाठी दिल्ली विद्यापीठ प्रवेश २०२१ प्रक्रिया पुढचे दोन आठवडे म्हणजे २ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी देखील पदवीअंतर्गत प्रवेशासाठी केंद्रीकरण सिस्टिम असणार आहे. एकाच अर्जाच्या माध्यमातून सर्व कॉलेज आणि विभागाचे फॉर्म भरले जाऊ शकतात. पदव्युत्तर प्रवेशासाठी एकाहून अधिक कोर्सेसला प्रवेश घेण्यासाठी देखील एकच अर्ज असेल. पण अर्ज शुल्क वेगवेगळे असेल. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही प्रवेश प्रक्रिया सहज, सोपी बनवू इच्छित आहोत. यामुळे विद्यार्थी प्रवेशापासून शुल्क भरण्याची प्रक्रिया घरबसल्या सहज पूर्ण करु शकतील. दिल्ली विद्यापीठामध्ये सन २०२१-२२ मध्ये प्रवेश प्रक्रिया आधारित कोर्सेसमध्ये बॅचलर ऑफ फिजिओथेरेपी, बॅचलर ऑफ ऑक्यूपेशन थेरेपी, बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक्स अॅण्ड ऑर्थोटिक्स आणि मास्टर ऑफ फिजिओथेरेपी यांचा समावेश केला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zCStwn
via IFTTT

Post a Comment

0 Comments