Also visit www.atgnews.com
आदिवासी आश्रमशाळा आणि निवासी शाळा ३ ऑगस्टपासून सुरु होणार
School Reopen: करोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय, आणि एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये ९ वी ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत. २ ऑगस्टपासून हे वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यावेळी करोना प्रतिबंध नियमांचे आणि मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे वर्ग १ डिसेंबर २०२० पासून सुरु होणार होते. त्यानंतर हा निर्णय पुढे ढकलून १५ फेब्रुवारी २०२१ वर्ग सुरु होणार होते. पण करोनाची दुसरी लाट टप्प्याटप्प्याने वाढत गेल्याने या निर्णयाला देखील स्थिगिती देण्यात आली. १५ एप्रिल २०२१ पासून पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तसेच डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला. मागच्या वर्षी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. एक वर्षांपासून मुलं घरी बसल्याने त्यांच्या शारीरिक, मानसिक दुष्परीणाम देखील झाले. जास्तवेळ शाळा बंद झाल्याने नुकसान भरुन काढणे कठीण होणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्ंयांसाठी नववी आणि अकरावी हा पाया असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी करोनामुक्त भागात शाळा सुरु करण्याची आणि आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सुचना शासनातर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत. २ ऑगस्ट २०२१ पासून शासकीय, अनुदानिक आश्रमशाळा आणि एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोविडमुक्त गावच्या ग्रामपंचायतीने पालकांशी चर्चा करुन ८ वी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी एक महिना गावात करोनाचा रुग्ण आढळला नसावा. आश्रमशाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनी लसीकरणाचा किमान एक डोस तरी पूर्ण केलेला असणे गरजेचे आहे. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची सोय संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन निर्णय झाल्यापासून १५ दिवसाच्या आत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लसीचा किमान एक डोस घ्यावा. असे न केल्यास त्यांना विनावेतन रजेवर पाठवण्यात येणार आहे. लसीकरण घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांना शाळेत रुजू करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा सुरु करण्यापपूर्वी शाळेची इमारत, सर्व खोल्या, बॅंच, टेबल, खुर्ची, स्टाफ रुम निर्जंतुक करावी. विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा बाहेरील नळावर हातपाय धुवून , तोंडाला मास्क लावून, हात सॅनिटाइझ करुन प्रवेश देण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36ZNiua
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments