MAHATET 2021: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० ऑक्टोबरला

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा () रविवार, १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर असणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ३ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होत आहे. २५ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित तसेच विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांनी या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परीक्षेशी संबंधित सर्व माहिती परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ आणि २ सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. चे वेळापत्रक ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी - ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१ (वेळ रात्री २३.५९ वाजेपर्यंत) प्रवेशपत्राचे ऑनलाइन प्रिंट घेणे - २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १- १० ऑक्टोबर २०२१ सकाळी १०.३० ते दुपारी १ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ - १० ऑक्टोबर २०२१ दुपारी २ ते सायंकाळी ४.३०


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rHQpAl
via IFTTT

Post a Comment

0 Comments