NEP 2020: नव्या शिक्षण धोरणामुळे होईल नव्या भविष्याची निर्मिती - पंतप्रधान

One Year of New Education Policy: गेल्या एक वर्षाच्या काळात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी करोना काळात शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आहे. शिक्षण धोरणावर करोना काळातही खूप काम झाले आहे. या नव्या शिक्षण धोरणाच्या माध्यमातून नवे भविष्य घडणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशवासियांना आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, 'मागील एक वर्षात देशातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खूप मेहनत घेतली आहे. आपण आपल्या युवकांना आता कशा पद्धतीचे शिक्षण देत आहोत, कोणती दिशा दाखवत आहोत, त्यावर भविष्यात आपण किती पुढे जाऊ, कोणत्या उंचीवर जाऊ ते ठरेल. पण भारताचे नवे हे राष्ट्र निर्माणाच्या महायज्ञातील एक महत्त्वाचा घटक आहे, असे मी मानतो.' नव्या शिक्षण धोरणामुळे होईल नव्या भविष्याची निर्मिती पंतप्रधान मोदी म्हणाले, ' २१ व्या शतकातील आजची तरुण पिढी आपलं जग स्वत: निर्माण करू इच्छिते म्हणूनच त्यांना अधिक एक्स्पोजर हवे. जुन्या बंधनांतून मुक्ती हवीय. राष्ट्रीय शिक्षण धोरण युवकांना विश्वास देत ईहे की आता देश पूर्णपणे त्यांच्या सोबत, त्यांच्या स्वप्नांसोबत आहे. जो आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कार्यक्रम आता लाँच केला आहे, तो आपल्या युवकांना फ्युचर ओरिएंटेड बनवेल आणि AI driven economy चे दार उघडेल.' चांगल्या शिक्षणासाठी परदेशातच जावं लागतं ही दशकांपासून चालत आलेली समज आहे. पण चांगल्या शिक्षणासाठी परदेशातून विद्यार्थी भारतात यावेत, अशा सर्वोत्तम शैक्षणिक संस्था भारतात येतील, हे आम्ही आता पाहू. आपल्या देशातील युवकांनी वर्तमानात निर्माण होणाऱ्या संधींसाठी जगापेक्षा एक पाऊल पुढे राहावं लागेल, एक पाऊल पुढचा विचार करावा लागेल. टेक्नॉलॉजी, हेल्थ, संरक्षण सर्व क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनावं लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. '८ राज्यांचे १४ इंजिनीअरिंग कॉलेज, ५ भारतीय भाषांमध्ये - हिंदी, तमिळ, तेलुगू, मराठी आणि बांगला मध्ये अभियांत्रिकीचा अभ्यास सुरू करत आहेत. इंजिनीअरिंग कोर्सेसचं ११ भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्याचं एक टूलही विकसित करण्यात आलं आहे. भारतीय साइन लँग्वेजला पहिल्यांदाच एक भाषा विषयाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आता विद्यार्थी ही एक भाषा म्हणून शिकतील. दिव्यांग विद्यार्थ्यांना यामुळे खूप फायदा होणार आहे,' असंही मोदी यांनी सांगितलं. नवे शिक्षण धोरण २०२० वर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यासह शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान देखील उपस्थित होते. वर्षभरापूर्वी याच दिवशी देशात नवे शिक्षण धोरण लागू करण्यात आले. ३४ वर्ष जुन्या शिक्षण धोरणात बदल करण्यात आला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ycoiMj
via IFTTT

Post a Comment

0 Comments