MES Pune Recruitment 2021: पुण्यातील दोन कॉलेजमध्ये शंभर जागा रिक्त, १ ऑगस्टपर्यंत करा अर्ज

MES Pune : पुण्यातील मॉर्डन एज्युकेशन सोसायटी यांच्या प्रशासनाअंतर्गत येणाऱ्या नौरोसजी वाडिया कॉलेज आणि नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण १०० जागा भरल्या जाणार आहेत. वेगवेगळ्या पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ९ महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. पुण्यातील नौरोसजी वाडिया कॉलेज आणि नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स या अनुदानित महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नौरोसजी वाडिया कॉलेजमध्ये भूगर्भशास्त्र, पदार्थविज्ञान, प्राणिशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, मानसशास्त्र, हिंदी, मराठी, राज्यशास्त्र या विषयासाठी सहायक प्राध्यापक पद भरली जाणार आहेत. तसेच नेस वाडिया कॉलेजमध्ये वाणिज्य, अर्थशास्त्र व बॅँकिंग आणि इंग्रजी शिकविण्यासाठी सहायक प्राध्यापकांची गरज आहे. वौरोसजी वाडिया कॉलेजमध्ये भूगर्भशास्त्रसाठी १२ जागा, पदार्थविज्ञानसाठी १० जागा, प्राणिशास्त्रासाठी १६ जागा, इलेक्ट्रॉनिक्ससाठी २ जागा, अर्थशास्त्रसाठी २ जागा, रसायनशास्त्रसाठी १६ जागा, वनस्पतीशास्त्रसाठी ४ जागा, मानसशास्त्रसाठी २ जागा, हिंदीसाठी २ जागा, मराठीसाठी २ जाग आणि राज्यशास्त्रसाठी २ जागा रिक्त आहेत. तसेच नेस वाडिया कॉलेजमध्ये वाणिज्य विषयासाठी २४ जागा, अर्थशास्त्र व बॅंकिंगच्या ६ जागा आणि इंग्रजीसाठी २ जागा रिक्त आहेत. सहाय्यक प्राध्यापक पदासठी लागणारी शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत देण्यात आली आहे. उमेदवारांना मॉर्डन एज्युकेशन सोसायटीच्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती पाहता येईल. २९ जुलैला यासंदर्भातील जाहिरात देण्यात आली. त्यानंतर पुढील ३ दिवसांच्या आत म्हणजे १ ऑगस्ट २०२१ पर्यंत उमेदवारांनी अर्ज करणे गरजेचे आहे. हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. मुलाखतीचा कार्यक्रम संस्थेच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील माहिती उमेदवारांना ईमेलवर पाठविण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी गुगल लिंक देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3C2pcNu
via IFTTT

Post a Comment

0 Comments