ICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ

आयसीएसई बोर्डाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक परिपत्रक जारी केले आहे. बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल अलिकडेच जाहीर झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपली श्रेणी सुधारायची आहे, त्यांच्यासाठी श्रेणीसुधार परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. विद्यार्थी ४ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. ही मुदत १ ऑगस्ट रोजी संपणार होती. कंपार्टमेंट परीक्षा (पुरवणी परीक्षा) आयसीएसई दहावीत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत, पण इंग्रजी आणि तीन अन्य विषयात उत्तीर्ण आहेत, तसेच आयएससी म्हणजेच बारावीचे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत, पण इंग्रजी आणि अन्य दोन विषयात उत्तीर्ण आहेत ते कंपार्टमेंट परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेच्या नोंदणीसही ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही नोंदणी देखील १ ऑगस्टला संपणार होती. ट्रान्सफर सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांना ट्रान्सफर सर्टिफिकेट हवी आहे, ते तशी मागणी आयसीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावरील करिअर्स पोर्टलवर करू शकतात. वरील दोन्ही परीक्षांना विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतर ट्रान्सफर सर्टिफइकेट प्रक्रियेची लिंक अॅक्टिव्ह होईल. इम्प्रूव्हमेंट आणि कंपार्टमेंट परीक्षा कधीपासून श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षा १६ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xgcqY7
via IFTTT

Post a Comment

0 Comments