मेडिकल कॉलेजांमधील प्रवेशांसाठी OBC आणि EWS विद्यार्थ्यांना मिळणार आरक्षण

Medical Reservation: मोदी सरकारने वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशांसाठी इतर मागासवर्गीय (OBC) आणि आर्थिक वंचित गट (EWS) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षण मंजूर केले आहे. आता दोन्ही ग्रॅज्युएट (MBBS, BDS) आणि पोस्ट ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा स्तरावरील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २७ टक्के आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण दिले जाणार आहे. दरवर्षी ५ हजारांहून अधिक तरुणांना होणार लाभ या निर्णयामुळे सुमारे ५,५५० विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की सरकार मागासवर्गीय आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गांना योग्य आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. दरवर्षी MBBS मध्ये सुमारे १,५०० आणि पीजीसाठी सुमारे २,५०० ओबीसी विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. याचप्रकारे MBBS मध्ये सुमारे ५५० आणि पीजीसाठी १००० ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. हे आरक्षण अखिल भारतीय कोट्यांतर्गत यूजी आणि पीजी मेडिकल/डेंटल कोर्स (एमबीबीएस/एमडी/एमएस/डिप्लोमा/बीडीएस/MDS)साठी चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून लागू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत माहिती दिली की त्यांच्या सरकारने मेडिकल कोर्सेसमध्ये ऑल इंडिया कोटा स्कीम अंतर्गत आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. यामुळे दर वर्षी हजारो युवकांना लाभ होणार आहे. या आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. अलिकडेच केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी खासदारांचे एक शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि नीट यूजी व पीजी मधील अखिल भारतीय कोट्यांतर्गत ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांच्या आरक्षणासाठी योग्य कार्यवाहीची मागणी केली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2THLt1X
via IFTTT

Post a Comment

0 Comments