घ्या 'लॉजिस्टिक मॅनेजमेंट'चे धडे; पुण्यातील बीएमसीसीमध्ये अभ्यासक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे ई-कॉमर्स व्यवसाय; तसेच दिवसेंदिवस डिजिटल होत चाललेल्या उद्योग क्षेत्रात आवश्यक असलेली सप्लाय चेन, , वेअर हाउस मॅनेजमेंट अशा विविध विषयांचे शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पुण्यातील 'बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स'मध्ये (बीएमसीसी) या वर्षीपासून 'बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज' हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून केंद्र सरकारच्या लॉजिस्टिक्स आणि स्कील सेक्टर या विभागाकडून याची निर्मिती करण्यात आली आहे. कोणत्याही विद्याशाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार असून त्यासाठी एक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. जनरल अॅप्टिट्युड टेस्ट स्वरूपाची ही परीक्षा असणार असून ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. १० ऑगस्टला ही परीक्षा होणार असून ऑनलाइन असल्याने काही तांत्रिक अडचणी आल्यास ११ व १२ ऑगस्टलाही विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देता येईल. अभ्यासक्रमासाठी पाच ऑगस्टपर्यंत www.bmcc.ac.in या वेबसाइट वर अर्ज करता येतील. करोनाच्या काळामध्ये व्यवसायाची अनेक गणिते बदलली आहेत. ई-कॉमर्स, लॉजिस्टिक मॅनेजमेंट, सप्लाय चेन या संकल्पनांचे महत्त्व या काळात अधिक कळले आहे. पुढील काळातही या संकल्पनांमध्ये पारंगत असलेले मनुष्यबळ आवश्यक आहे. या दृष्टीने हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार असून यामध्ये विद्यार्थ्यांना पहिली दोन वर्षे कॉलेजच्या शिक्षणाबरोबर शेवटच्या वर्षात कार्यानुभवाची संधी घेता येणार आहे. शेवटचे संपूर्ण वर्ष विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणे अनिवार्य असणार असून त्यासाठी मानधनही मिळणार आहे. याच कंपन्या पुढे जाऊन या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात. अभ्यासक्रम दृष्टीक्षेपात नाव : बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज कॉलेज : बीएमसीसी पात्रता : कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण प्रवेश परीक्षा : ऑनलाइन पद्धतीची जनरल अॅप्टिट्युड टेस्ट परीक्षेचा दिनांक : १० ऑगस्ट (११ व १२ तारीख राखीव) अभ्यासक्रम, प्रवेश माहिती : www.bmcc.ac.in अभ्यासक्रमाचा कालावधी : तीन वर्षे सध्याच्या काळात ई-कॉमर्स व्यवसायात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. भविष्यातही या संधींमध्ये मोठी वाढ होणार आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना लॉजिस्टिक्स, सप्लाय चेन, वेअर हाउस मॅनेजमेंट, अशा विविध विषयांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाचे तिसरे वर्ष हे पूर्ण कार्यानुभवावर आधारित असून या वर्षी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जाईल. - प्रा. भारती उपाध्ये, समन्वयक, बीएमसीसी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j0yiBN
via IFTTT

Post a Comment

0 Comments