RRB NTPC भरती परीक्षेच्या ७व्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर

: आरआरबी एनटीपीसी भरती परीक्षेच्या सातव्या टप्प्याचे शेड्युल्ड जाहीर करण्यात आले आहे. या टप्प्यात एनटीपीसी परीक्षा २३,२४,२६ आणि ३१ जुलैला आयोजित केली जाणार आहे. तसेच या टप्प्यात साधारण २२.७८ लाख उमेदवार परीक्षा देणार आहेत. ज्या उमेदवारांची परीक्षा असेल त्यांच्या परीक्षेचे शहर, तारीख, शिफ्ट डिटेल्सची लिंक रिजनल आरआरबी वेबसाइटवर परीक्षेच्या १० दिवस आधी अॅक्टीव होईल. १३ जुलैला उमेदवारांना आपल्या परीक्षेचे शहर, शिफ्टची डिटेल्स तपासता येईल. एससी, एसटी वर्गातील उमेदवार प्रवास परवानगी देखील दहा दिवस आधी डाऊनलोड करु शकतील. सातव्या टप्प्यात उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र परीक्षेचा चार दिवस आधी उपलब्ध होईल. आरआरबी वेबसाईटवर जाऊन ते प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकतात. सातव्या टप्प्यात उमेदवारांच्या मोबाइल आणि ईमेलवर परीक्षेची तारीख पाठवली जाणार आहे. परीक्षेदरम्यान कोविड १९ नियमांचे पूर्णपणे पालन केले जाईल असे रेल्वेने म्हटले आहे. उमेदवारांनी परीक्षेला येताना मास्क घालणे गरजेचे आहे. परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली जाईल. करोना आणि राज्यातील लॉकडाऊन पाहता सीबीटी स्थगित करण्यात आल्याचे आरआरबीने म्हटले. परिस्थिती आणि निर्बंध शिथिल झाल्यानंतर शेड्यूल्ड जाहीर केले जाईल. आरआरबी एनटीपीसी परीक्षेसंदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आरआरबीची अधिकृत वेबसाईट्स पाहणे गरजेचे आहे. एनटीपीसी सहाव्या टप्प्यातील परीक्षा एप्रिलच्या १,३,५,६,७ आणि ८ तारखेला होती. सहाव्या टप्प्यात ६ लाख उमेदवार सहभागी होते. यानंतर उमेदवार सातव्या टप्प्यातील तारखेची वाट पाहत होते. एनटीपीसी भरतीमध्ये एकूण १.२५ कोटी युवकांनी अर्ज केला होता. एनटीपीसीमध्ये पहिल्या टप्प्यातल्या परीक्षा २८ डिसेंबर २०२० पासून १३ जानेवारी २०२१ पर्यंत झाल्या. ज्यामध्ये २३ लाख उमेदवार सहभागी झाले. यानंतर दुसरा टप्पा १६ जानेवारीपासून ३० जानेवारीपर्यंत चालला. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत २७ लाख उमेदवारांनी सहभाग घेतला. तिसऱ्या टप्प्यात ३१ जानेवारी २०२१ ते १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत चालली. या टप्प्यात साधारण २८ लाख उमेदवारांनी सहभाग घेतला. चौथा टप्पा १५ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत चालला. यामध्ये १५ लाख उमेदवार सहभागी होते. एनटीपीसी परीक्षा ४,५,७,८,९,११,१२,१३,१४,२१ आणि २७ मार्चला आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एकूण १९ लाख उमेदवार होते. एनटीपीसी भरती परीक्षेच्या माध्यमातून ३५,००० पदे भरली जाणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hrL8YX
via IFTTT

Post a Comment

0 Comments