Also visit www.atgnews.com
School, College Reopen 2021: आजपासून 'या' राज्यांमध्ये शाळा-कॉलेज सुरु करण्यास परवानगी
School, : देशातील अनेक राज्यांमध्ये शालेय शिक्षण संस्था आणि उच्च शिक्षण संस्था २६ जुलैपासून सुरु होत आहेत. काही ठिकाणी शालेय स्तरावर सिनीअर वर्गातील विद्यार्थ्यांना बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे. या संस्थाना करोना प्रतिबंध नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या राज्यात शाळा-कॉलेज आजपासून सुरु झाले आहेत तिथे देखील करोना प्रतिबंध निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. कोणत्या राज्यांतील आणि आजपासून खुले झाले आहेत याची माहिती घेऊया. मध्य प्रदेश- मध्य प्रदेश सरकारने अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून वर्ग सुरु करण्याची परवानगी दिली आहे. तसेच नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना ५ ऑगस्टपासून बोलावण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांसाठी शाळा ऑफलाइन वर्ग सुरु करणार आहे. शाळेतर्फे एकावेळेस ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वर्ग भरतील. गुजरात- गुजरातमध्ये देखील आजपासून सरकारी आणि खासगी शाळा सुरु झाल्या आहेत. सिनीअर वर्ग नववी ते बारावीपर्यंत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. एकावेळेस ५० टक्के विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले आहे. ओडिसा- राज्य सरकारने दहावी आणि बारावीचे वर्ग पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी पालकांची परवानगी आवश्यक आहे. ज्यांना ऑफलाइन वर्गात यायचे नाही ते ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतात. यानुसार राज्यातील शाळा आणि कॉलेज आजपासून उघडले जाणार आहेत. पंजाब- सरकारी आणि खासगी शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु होणार आहेत. शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी करोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. ऑफलाइन वर्गासाठी पालकांची परवानगी आवश्यक आहे. तसेच ऑनलाइन शिक्षण पहिल्याप्रमाणे सुरु राहणार आहे. कर्नाटक - राज्याच्या यूजी आणि पीजी कॉलेजचे वर्ग आजपासून खुले करण्यात आले आहेत. ७५ टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना स्थानिक विभागातील करोना प्रतिबंध नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्सिंग ठेवावे लागणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eWT1Fs
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments