Also visit www.atgnews.com
AIEEA-PG आणि AICE-JRF/SRF परीक्षेच्या पात्रता निकषांमध्ये बदल
ICAR AIEEA Exam 2021: राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA)च्या ICAR AIEEA यूजी आणि पीजी परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. एनटीएतर्फे २०२१-२२ च्या शैक्षणिक सत्रात देशभरातील कृषी विद्यापीठांमध्ये कृषी आणि संलग्न विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण नोटीस जाहीर करण्यात आली आहे. एनटीएने AIEA-PG आणि AICE-JRF/SRF साठी पात्रता निकषांमध्ये बदल केले आहेत. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भातील पूर्ण नोटिफिकेशन वाचता येणार आहे. ही परीक्षा २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी PG आणि ICAR च्या डॉक्टरेट अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेतली जाईल. एनटीएने जाहीर केलेल्या नोटीसमध्ये म्हटल्याप्रमाणे, आयसीएआर मान्यतेमध्ये काही आंशिक बदल करण्यात आले आहेत. इतर निकषांमध्ये काही बदल करण्यात आला नाहीय. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी गोंधळून न जाता अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशन पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच हा बदल लक्षात घेऊन नंतर परीक्षेसाठी अर्ज करा असा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे. प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया २५ जुलैपासून सुरू झाली असून २० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. ज्या उमेदवारांना आता या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट icar.nta.ac.in वर जाऊन अर्ज करु शकतात. एजन्सीने ICAR नॅशनल टॅलेंट स्कॉलरशिप (NTS) च्या पुरस्कारासाठी देखील पात्रता निकष बदलले आहेत. या परीक्षेशी संबंधित अधिक माहिती विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर मिळू शकणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yWD5Lv
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments