Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठ राज्यात अव्वल; नॅककडून A++ श्रेणीचा दर्जा
gets : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai university)आजी माजी सर्व विद्यार्थी, शिक्षक वर्ग, सिनेट सदस्य, कर्मचारी या सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबई विद्यापीठाला नॅकचा A++ श्रेणीचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. नॅककडून अधिकृतरित्या याची घोषणा करण्यात आली. यासाठी विद्यापीठाला एकूण ३.६५ गुण मिळाले असून राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत हे सर्वाधिक आहेत. या कामगिरीमुळे मुंबई विद्यापीठाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विद्यापीठ आणि संबंधित महाविद्यालयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी देखील मुंबई विद्यापीठाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय मूल्यांकन आणि श्रेयांकन परिषद ( NAAC ) संस्थेकडून मुंबई विद्यापीठास ३.६५ गुणांसह A++ मानांकन मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, सिनेट सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यार्थी व सर्व संबंधितांचे महाराष्ट्र शासनाकडून मनःपूर्वक अभिनंदन! असे उदय सामंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मुंबई विद्यापीठाला हा दर्जा मिळाल्यामुळे शैक्षणिक दर्जामध्ये मोठी सुधारणा पाहायला मिळणार आहे. विद्यापीठात अनेक महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम, संशोधन आणि विविध प्रकारच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची महत्वाची बाब पूर्ण होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zAJoo7
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments