Also visit www.atgnews.com
करोना काळात शाळेत जाणाऱ्या मुलांना असा द्या आधार; पालकांसाठी महत्वाची संवाद पद्धत
Emotionally support: काळात वर्षभरापेक्षा जास्त काळ घरी राहिलेल्या मुलांसाठी पुन्हा शाळा सुरु होत आहेत. अशावेळी पालकवर्गाच्या मनात थोडीशी अनिश्चितता आहे. पौगंडावस्थेतील मुलांमध्ये नैराश्य आणि चिंतेच्या लक्षणांमध्ये वाढ झाली आहे. या काळात मुलांना शाळेत परत पाठवणे ही एक महत्त्वाची पायरी आहे पण यासाठी संपूर्ण घराचा पाठींबा असणे गरजेचे आहे. जेव्हा मुलांना वर्गात आणि घरी दोन्हीकडून सहकार्य मिळते तेव्हा ते सर्वात यशस्वी होतात असे म्हटले जाते. वॉटरलू विद्यापीठाचे डिलन थॉमस ब्राउन, कॅनडाच्या यॉर्क विद्यापीठाचे हिथर प्राइम आणि टोरंटो विद्यापीठातील जेनिफर जेनकिन्स आणि मार्क वेड यांच्या टीमने अशा लक्षणांना सामोरे जाणाऱ्या किशोरवयीन मुलांना मदत करण्यासाठी योजना आखली आहे. ही मंडळी करोना काळात मुलांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये उद्भवलेली उदासीनता, चिंता आणि मानसिक आरोग्याचा अभ्यास करत आहेत. साथीच्या रोगाचा कसा परिणाम झाला? दक्षिणी ओंटारियोमधील कौटुंबिक विज्ञान संशोधन गटाने अलीकडेच तीन संशोधन अहवाल प्रकाशित केले. ज्यामध्ये साथीच्या रोगाचे नातेसंबंध आणि मुलांच्या आणि कुटुंबांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम झाला ? याचे तपशीलवार वर्णन केले आहे. हा निष्कर्ष जगभरातील ५४९ कुटुंब आणि १०९८ मुलांच्या नमुन्यांवर आधारित आहे. यातून असे समोर आले की, साथीच्या रोगाचा ताण पुढील तीनपैकी एका प्रकारात येतो. आर्थिक ताण (नोकरी गमावणे, कर्जाची समस्या यासारख्या कारणांमुळे), नातेसंबंधाचा ताण (कुटुंबातील सदस्यांमध्ये विभक्त होणे किंवा शत्रुत्व यासारख्या कारणांमुळे), आणि साथीच्या आजारांमुळे. बरेच पालक इतके तणावाखाली असतात की ते आपल्या मुलांना भावनिक आधार देऊ शकत नाहीत. या व्यतिरिक्त, साथीच्या आजारामुळे सर्व कुटुंबांवर वेगवेगळा परिणाम झालेला दिसून आला. या काळात भावनात्मक प्रशिक्षण ही संवादाची एक पद्धत आहे. मानसशास्त्रज्ञ जॉन गॉटमन यांच्या अध्ययावरुन ही तयार करण्यात आली आहे. त्यानंतर विविध थेरपी पद्धतींमध्ये याचा समावेश करण्यात आला. सर्वांना या संवाद पद्धतीचा उपयोग करणे शक्य आहे. ही पद्धत पुढील प्रमाणे आहे. १) पालकांनी सर्वप्रथम मुलांच्या भावनांना प्राधान्य द्या. "मला समजतेय की तुला चिंता वाटतेय..." असे म्हणावे तसेच "... सप्टेंबर येत आहे. इतके दिवस घरी राहिल्यानंतर शाळेत जाणे हा कसा अनुभव असेल. " असे पालकांनी सविस्तरपणे विचारावे. यामुळे मुलांना असे वाटेल की, आपल्या भावना चुकीच्या नाहीत. जर मला शाळेत जाऊ नये असे वाटत असेल तर त्यात गैर नाही. माझ्या पालकांनादेखील याची जाणीव आहे. २) यानंतर मुलांना दिलासा देत, आश्वस्त करुन भावनात्मक सहकार्य करा. तुम्ही मुलांशी असे बोलू शकता, 'मी या काळात प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत असेन.' यानंतर मुलांचे लक्ष दुसरीकडे नेऊन त्यांच्या समस्या सोडवून किंवा त्यांना प्रोत्साहन देऊन व्यावहारिक सहकार्य करा. सप्टेंबरमधील अनिश्चिततेबद्दल मुलांना काळजी असेल तर आईवडिलांना त्याच्यासाठी काहीतरी मनोरंजनात्मक करता येईल. जर एखादे किशोरवयीन मुल शाळेत जाण्यास नकार देत असेल तर पालक त्याला किंवा तिला प्रोत्साहित करू शकतात. पालकांच्या भावना शाळेत परतणाऱ्या मुलांना भावनिक आधाराची आवश्यकता असू शकते. यासाठी पालकांनी भावनिकरित्या मजबूत असणे महत्वाचे आहे. विविध पद्धतींचा अवलंब करून, मानसिक आरोग्यावर ऑनलाइन उपलब्ध साहित्य वापरून किंवा व्यायाम, निरोगी अन्न खाणे आणि पुरेशी झोप यासारख्या मार्गांनी पालकांना भावनांचे व्यवस्थापन करता येऊ शकते. त्यामुळे शाळा पुन्हा सुरु होण्यापुर्वी आपल्या मुलांशी खुलेपणाने बोला असा सल्ला देण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BiFiS6
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments