Also visit www.atgnews.com
कोटातील कोचिंग इन्स्टिट्यूट्स येत्या १ सप्टेंबरपासून सुरू होणार
कोटातील कोचिंग इन्स्टिट्यूट्स येत्या १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. राजस्थान सरकारने राज्यातील सर्व शाळा उघडण्याची परवानगी दिली आहे. मात्र, कोचिंग क्लासेसना अनेक सुरक्षिततेचे उपाय योजण्यास सांगण्यात आले आहे. वसतिगृहे आणि मेसच्या ठिकाणी बायोमेट्रिक हजेरीच्या ऐवजी आता रजिस्टरद्वारे उपस्थिती नोंदवण्यात येणार आहे. या रजिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना इन्फ्लुएंझासारखे आजार झाली असतील तर त्याची नोंद एका स्वतंत्र रकान्यात करण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांवर वैद्यकीय पथके देखरेख ठेवणार आहेत. दरवर्षी देशभरातून सुमारे १.७५ लाख विद्यार्थी विविध अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी येथे दाखल होतात. शहरात सुमारे ३५ ते ४० कोचिंग क्लास आहेत. सुमारे ३ हजार वसतिगृहे आणि शेकडो मेसेस या विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय करतात. या विद्यार्थ्यांमुळे येथील स्थानिक अर्थकारण विकसित झाले आहे. मात्र कोविड काळात यावर खूप मोठा परिणाम झाला होता. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल, त्यांचे लसीकरण पूर्ण झाले का हेही पाहण्यात येईल, असे संस्थांचे म्हणणे आहे. विद्यार्थी शहरात दाखल झाल्यानंतर त्यांचा RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह आहे की नाही हे पाहिले जात आहे. ज्यांनी लस घेतली नसेल, त्यांच्या लसीकरणाची देखील व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती कोटाच्या जिल्हाधिकारी उज्वल राठोड यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gHTImR
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments