वेदांतु : शिकण्याची नवी व्याख्या देत शैक्षणिक प्रगतीची हमी देणारा प्लॅटफॉर्म

सामान्य शिक्षक सांगतात. चांगले शिक्षक समजावून सांगतात. श्रेष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक दाखवतात. महान शिक्षक प्रेरणा देतात- विल्यम आर्थर अध्यापन आणि अध्ययनाच्या प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची असते. सर्वात प्रभावी शैक्षणिक अनुभव आणि परिणामांच्या रचनेच्या मुळाशी एक उत्तम शिक्षक असतो. जर तुम्ही तुमच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीकडे मागे वळून पहाल, तर तुम्हाला प्रभावशाली शिक्षकांची बहुसंख्य विशिष्ट वैशिष्ट्ये आणि धारणा समजून येईल. प्रभावी शिक्षक होण्यासाठी त्या सर्वांनी त्यांचा व्यवसाय आणि त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल मनापासून काळजी घेतलेली दिसेल. याच जाणिवेतून वेदांतु या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मची निर्मिती झाली. भारतातील प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण आणि परवडणारे शिक्षण देणे हे वेदांतुचे उद्दिष्ट आहे. ऑनलाइन लर्निंग प्रभावशाली व्हावं यासाठी या शैक्षणिक आणि तांत्रिक प्लॅटफॉर्मच्या मदतीने विद्यार्थीकेंद्री शिक्षण देण्याकडे भर असतो. याच्या केंद्रस्थानी सर्वोत्कृष्ट, नाविन्यपूर्ण आणि प्रभावशाली शिक्षण देणारे अध्यापन आहे. म्हणूनच वेदांतुकडे असे शिक्षक आहेत जे शैक्षणिकदृष्ट्या उत्तम आणि सर्वोत्तम माणसं घडवतात, केवळ ज्ञान वाहून नेणारे विद्यार्थी नव्हेत. थोडक्यात, वेदांतूचे शिक्षक हे योगायोगाने शिक्षक बनले नसून स्वत:च्या निवडीने या क्षेत्रात आहेत. केवळ शैक्षणिक सेवा देण्यापलिकडचं अध्यापन घडवण्याच्या प्रेरणेतूनच वेदांतु इम्प्रूव्हमेंट प्रॉमिस म्हणजेच हे व्यासपीठ सुरू झालं. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर सुधारण्याची हमी देणारं एक व्यासपीठ यामुळे तयार झालं. एका वर्षात सुधारणार दिसली नाही तर या लाइव्ह ऑनलाइन ट्युटोरिअलच्या माध्यमातून सर्व फी परत केली जाईल, याची हमी देण्यात येते. यामुळे पालकांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तर मिळतं. मुलाला जर परीक्षेत चांगले गुण मिळाले नाहीत तर त्याची जबाबदारी केवळ मुलावर आणि पालकांवरच का असावी, शैक्षणिक व्यासपीठाची, शाळेची आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची का असू नये? या परस्पर जबाबदारीच्या भावनेतूनच विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारण्याची विश्वासार्हता पालकांना मिळते. वेदांतु जे काही आज आहे त्याबाबतची सर्व माहिती देणारं एक फेसबुक सत्र आहे, ज्यात वेदांतुच्या सीईओ आणि सहसंस्थापक वामसी कृष्णा आणि टाइम्स ऑफ इंडियाचे सहाय्यक निवासी संपादक सुजीत जॉन यांच्यातील संवादातून वेदांतुची माहिती मिळते. लक्ष्य इनिशिएटिव्हद्वारे कसं सर्व सुर झालं, वेदांतुची स्थापना कशी झाली, अध्यापनाची कोणती तत्वे येथे पाळली जातात, VIP काय आहे आणि वेदांतु शिक्षक कसे हे अनोखे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहेत, आदी सर्व बाबी या सत्रातून स्पष्ट होतात. आपल्याला माहिती असल्याप्रमाणे वेदांतुतर्फे पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वन टू वन ते अनेक लाइव्ह ऑनलाइन वर्ग घेऊन विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार केले जाते. हा अभ्यासक्रम थेट प्रत्यक्ष वेळेत, परस्परसंवादी आभासी शिक्षण वातावरणात शिकवला जातो. हा प्लॅटफॉर्म मोफत, विषयापलीकडे लाइव्ह मास्टरक्लासेस अॅप, वेब आणि यूट्यूब चॅनेलवर विनामूल्य उपलब्ध करुन देतो. तथापि,या शैक्षणिक प्लॅटफॉर्मचा प्रवास हा वामसी कृष्णा यांनी सांगितल्याप्रमाणे, उच्च प्रतीच्या आकांक्षा, प्रेरणादायी बेंचमार्क आणि व्यवसायाची प्रतिमा बदलून शिक्षण समजण्यायोग्य बनवण्याच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेशी जुळवून घेण्याच्या लॉजिस्टिक आव्हानांनी भरलेला आहे. जरी भारतामध्ये अध्यापनाला नेहमीच एक उदात्त व्यवसाय मानले गेले असले तरी ते उत्कट अध्यापनाची पोकळी कधीच पूर्ण झाली नाही. वेदांतूची शिकवण्याची ताकद केवळ तज्ञ नव्हे तर शिकवण्याची आवड असलेल्या आणि स्वत:च्या निवडीनुसार बनलेले शिक्षक ही आहे; ते विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कौशल्ये देतात जे वर्गात आणि व्यावहारिक जीवनात वापरता येतात. वेदांतूचे शिक्षक त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर सतत लक्ष ठेवतात आणि विद्यार्थ्यांचे वर्गानंतरचे उपक्रम, कामगिरी आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी साप्ताहिक शिक्षण योजनांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सतत निरीक्षण करतात. यातील विद्यार्थ्यांची कामगिरी पालक-शिक्षक संवादातून समोर आणली जाते. जेणेकरून पालकांना देखील त्यांच्या मुलांच्या प्रगतीमध्ये सहभागी करता येते. व्हीआयपी - योग्य दिशेने पाऊल वेदांतू विद्यार्थ्यांना अध्यापनाची आवड असलेल्या देशभरातील सर्वात कुशल शिक्षकांसोबत प्रत्यक्ष वेळ देण्याचा तसेच प्रत्यक्ष वर्गाप्रमाणे समवयस्क-शिक्षण वातावरणाचा अनुभव देते. अवघड विषय थ्रीडीच्या माध्यमातून, लाइव्ह प्रश्नोत्तरे आणि खेळांच्या माध्यमातून शिकवून विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले जाते. याव्यतिरिक्त, वेदांतूचे नाविन्यपूर्ण लाइव्ह व्यासपीठ विद्यार्थी आणि शिक्षकांमधील थेट आणि प्रत्यक्ष संवादाला मदत करते, यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन होते. याव्यतिरिक्त, वेदांतूचे पेटंट आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सक्रीय लहरींच्या अद्वितीय तंत्रज्ञानातून मशिनद्वारे शिकवणी वर्गादरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या पद्धतींचे मूल्यांकन करते. मुलाच्या प्राथमिक शिक्षणापासूनच्या कामगिरीसोबत पालंकाचा सहभाग सकारात्मकपणे सातत्याने जोडलेला दिसून येतो. विशेषतःज्या मुलांचे पालक त्यांच्या शिक्षणात अधिक गुंतलेले आहेत त्यांची शैक्षणिक कामगिरी ज्यांचे पालक कमी प्रमाणात सहभागी आहेत त्यांच्या तुलनेत उच्च दर्जाची असते. व्हीआयपी प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामगिरीची जबाबदारी घेऊन पालकांना त्यांच्या मुलाच्या प्रगतीबद्दल अत्यंत पारदर्शक पद्धतीने इंतभूत माहिती देते. बऱ्याचदा पालकांनी हे पाहिलेले नसते. करोनाच्या साथीपासून मुलांचा बचाव करण्याच्या हेतूने २०२० च्या सुरुवातीपासून शाळा बंद आहेत. यानंतर खडू आणि बोर्डच्या माध्यमातून शिकवणीला रातोरात डिजिटल माध्यमांकडे जावे लागले. डिजिटल शिक्षण धोरण अचानक आत्मसात करणे हे शिक्षकांसाठी सोपे नाही. भारतीय शिक्षण व्यवस्थेत अडथळा निर्माण झाल्यामुळे, वेदांतू विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात सहाय्य करुन विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या चिंतेत असलेल्या पालकांना मदत करते. (डिस्क्लेमर: हा लेख वेदांतूच्या वतीने टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने तयार केला आहे.)


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gFV6Gw
via IFTTT

Post a Comment

0 Comments