Also visit www.atgnews.com
सार्वजनिक आरोग्य विभागात जम्बो भरती; २७२५ जागा रिक्त
2021: मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. याद्वारे एकू २ हजार ७२५ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी २० ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि पगार हा पदांनुसार वेगळा असणार आहे. आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या जाहीरातीमध्ये याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कोणत्या पदांची भरती? सार्वजनिक आरोग्य विभागात (गट-क) अंतर्गत एकूण ५२ पदाच्या एकूण २७२५ जागा भरण्यात येणार आहेत. भंडार नि वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, एक्सरे तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, दंत यांत्रिकी, डायलिसिस तंत्रज्ञ, दूरध्वनीचालक, वाहनचालक, शिंपी, नळकारागीर, सुतार, नेत्र चिकित्सा अधिकारी, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, भौतिकोपचार तज्ञ, व्यवसोपचार तज्ञ, वार्डन, कनिष्ठ लिपिक, दंतआरोग्यगक, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहायक,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, पेशी तज्ञ, ग्रंथपाल आणि इतर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. जाहीरातीमध्ये दिलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी आमंत्रित करण्यात येईल. नोकरीचा तपशिल या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क आणि पगारासाठी मूळ जाहीरात पाहणे गरजेचे आहे. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वेबसाइटवर ६ ऑगस्टपासून खुली करण्यात आली आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. शेवटची तारीख या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २० ऑगस्ट २०२१ रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. यानंतर आलेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही. तसेच ऑफलाइन माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iqxabp
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments