वर्ध्याच्या ग्रामीण आरोग्य विभागात १८७ जागा रिक्त, जाणून घ्या डिटेल्स

Wardha : वर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्यात विविध पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अनुभव यांचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. जिल्हा परिषद, वर्धा अधिनस्त असलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. वर्ध्याच्या ग्रामीण आरोग्य विभागात एकूण १८७ जागा भरण्यात येणार आहेत. या पदभरतीअंतर्गत आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका पदांचा समावेश आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज १४ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन माध्यमातून पाठवायचा आहे. यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसंदर्भात सरकारी पोर्टलवर मार्च २०१९ मध्ये अर्ज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती पण महापोर्टल बंद झाल्याने ही प्रक्रीया पुढे ढकलण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्याची गरज पाहता या पदभरती अंतर्गत फार्मासिस्ट आणि आरोग्य सेवक पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. मार्च २०१९ मध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. या पदभरतीअंतर्गत मागासवर्गीय उमेदवार, अपंग उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार ऑनलाइन परीक्षेकरीता उमेदवाराला एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा होती. पण शासनाचे महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्याने परीक्षा OMR Vendor मार्फत ऑफलाइन पद्धतीन होणार आहे. या परीक्षा सर्व जिल्हा परिषदांमार्फत एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेतून परीक्षा देता येईल. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://maharddzp.com/ वर जाऊन आपला अर्ज भरायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२१ आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून त्यानंतर अर्ज करावा. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. अर्ज ऑनलाईन माध्यमातून करायचा आहे. १४ सप्टेंबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ysfJfq
via IFTTT

Post a Comment

0 Comments