Also visit www.atgnews.com
परभणीच्या आरोग्य विभागात १६० जागा रिक्त, जाणून घ्या डिटेल्स
Health Department Recruitment: परभणी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या अंतर्गत एकूण १६० जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव आणि पगार यांचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या भरती अंतर्गत औषध निर्माता आरोग्य सेवक, सेविका आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. दिनांक १ ते १४ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. या भरती अंतर्गत खेळाडू, माजी सैनिक, महिला, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना सरकारी नियमानुसार सवलत मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला सातव्या वेतन श्रेणीनुसार पगार मिळणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवार दिनांक १ ते २१ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार ऑनलाइन परीक्षेकरीता उमेदवाराला एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा होती. पण शासनाचे महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्याने परीक्षा OMR Vendor मार्फत ऑफलाइन पद्धतीन होणार आहे. या परीक्षा सर्व जिल्हा परिषदांमार्फत एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेतून परीक्षा देता येईल. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://maharddzp.com/ वर जाऊन आपला अर्ज भरायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२१ आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून त्यानंतर अर्ज करावा. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. अर्ज ऑनलाईन माध्यमातून करायचा आहे. उमेदवारांनी दिनांक १ ते २१ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पर्याय निवडताना काही अडचण आल्यास उमेदवारांना ७२९२००६३०५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार महत्वाचे बदल करण्याचे अधिकार शासनाकडे आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kyLLBr
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments