Also visit www.atgnews.com
स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडियामध्ये २२० जागांची भरती, जाणून घ्या डिटेल्स
Sports Authority of India: भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे विविध खेळांसाठी सहाय्यक प्रशिक्षक पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट sportsauthorityofindia.nic.in ला भेट देऊन ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख: २७ ऑगस्ट २०२१ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० ऑक्टोबर २०२१ पदांचा तपशील: हाय्यक प्रशिक्षक पदांच्या एकूण २२० जागा रिक्त आहेत. ही सर्व पदे विशिष्ट कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. शैक्षणिक पात्रता: सहाय्यक प्रशिक्षक पदासाठी उमेदवाराकडे SAI, NS NIS किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय/परदेशी विद्यापीठातून कोचिंगमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. ऑलिम्पिक/आंतरराष्ट्रीय सहभाग, किंवा द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त उमेदवारांना या भरतीमध्ये प्राधान्य मिळेल. वयोमर्यादा: नोटिफिकेशननुसार उमेदवाराचे कमाल वय ४० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार वयाची गणना केली जाईल. पात्रता निकषांची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, संगणक प्रविण्य चाचणी आणि पात्रतेसाठी निर्धारित गुणांच्या आधारे केली जाणार आहे. तोंडी चाचणीसह मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. त्यातील पात्रता निकषांचा तपशील वाचून त्यानंतर अर्ज भरायचा आहे. १० ऑक्टोबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच वयाची मर्यादा १० ऑक्टोबरपर्यंत मोजली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jhht6P
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments