आयडीबीआय बॅंकेत विविध पदांच्या ९२० जागा रिक्त, १८ ऑगस्टपर्यंत करा अर्ज

IDBI Recruitment 2021: औद्योगिक विकास ऑफ इंडिया (IDBI) मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. या अंतर्गत एकूण ९२० जागा भरण्यात येणार आहे. वेगवेगळ्या ब्रांच आणि ऑफिसमध्ये एक्झिक्युटिव्ह पदांची भरती केली जाणार आहे. कार्यकारी अधिकारी पदांच्या ९२० जागा भरण्यात येणार असून यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय १ जुलै २०२१ पर्यंत २० वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. अनुसूचित जाती, जमाती आणि आर्थिक मागास वर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत देण्याात आली आहे. शैक्षणिक पात्रता ५ सप्टेंबर २०२१ या दिवशी ऑनलाइन टेस्ट होण्याची शक्यता आहे. वय आणि शिक्षणाची पात्रता मुदत ही १ जुलै २०२१ असेल. उमेदवाराला पदवीमध्ये किमान ५५ % असणे अपेक्षित आहे. तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ५० % गुण असणे गरजेचे आहे. पगार निवड झालेल्या उमेदवारास पहिल्या वर्षी २९ हजार रुपये इतका पगार मिळेल. दुसऱ्यावर्षी ३१ हजार इतका पगार तर तिसऱ्या ३४ हजार दरमहा इतका पगार दिला जाईल. या ३ वर्षानंतर उमेदवार बॅंकेत असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी निवडला जाईल. कार्यकाळादरम्यान उमेदवाराला आयडीबीआयच्या कोणत्याही ऑफिस, ब्रॅंचमध्ये बॅंकेच्या गरजेनुसार पाठवण्यात येईल. तसेच कॉन्ट्रॅक्टवर कामाला राहीलेले उमेदवार कोणत्याही ग्रॅच्युटी आणि प्रॉविडंट फंडसाठी पात्र नसतील. नोंदणी शुल्क उमेदवाराकडे भारतीय नागरिकत्व असणे गरजेचे आहे. उमेदवारांना अर्जासोबत १ हजार रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर अनुसूचित जाती, जमाती आणि इतर आर्थिक मागास वर्गातील उमेदवारांना २०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. ४ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज शुल्क भरता येणार आहे. अंतिम तारीख इच्छुक आणि पात्र उमेदवार १८ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. हा अर्ज ऑनलाइन माध्यमातून करायचा आहे. अंतिम मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा स्वीकार केला जाणार नाही. ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. ही भरती करण्यासाठी कोणती एजन्सी किंवा व्यक्ती निवडलेली नाही हे बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे कमिशन, पैसे मागणाऱ्या भूलथापांना बळी पडू नका.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jkEa96
via IFTTT

Post a Comment

0 Comments