पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचा मोठा दिलासा; गहाळ गुणपत्रिकांच्या प्रती देणार मोफत

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या तसेच पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाने मोठा दिलासा दिला आहे. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्राच्या दुय्यम प्रती विद्यापीठाकडून मोफत पुरविण्यात येणार आहेत. विद्यापीठाने यासंबंधी जारी केलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांची गुणपत्रके आणि पदवी प्रमाणपत्रे गहाळ झाल्याची शक्यता आहे. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्राच्या दुय्यम प्रती विद्यापीठाकडून नि:शुल्क पुरविण्यात येणार आहेत. या प्रती विद्यार्थ्यांच्या संबंधित महाविद्यालयात पाठवण्यात येतील. यासाठी विद्यार्थ्यांनी शासकीय पंचनाम्याच्या प्रतीसह आपली माहिती certificate_help@exam.mu.ac.in या ई-मेल आयडीवर विद्यापीठाकडे सादर करावी. विद्यार्थ्यांनी आपली माहिती पुढील फॉरमॅटमध्ये पाठवायची आहे - अभ्यासक्रमाचे नाव परीक्षेचे वर्ष सत्र आसन क्रमांक गुणपत्रक हवे असल्यास पुढील रकान्यात टीक करावे पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास पुढील रकान्यात टीक करावे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्य सामानाचे जसे नुकसान झाले तसेच अनेकांची शैक्षणिक प्रमाणपत्रेही गहाळ किंवा खराब झाली आहेत. अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या या सहकार्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fyLuwP
via IFTTT

Post a Comment

0 Comments